30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर; सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.

Jarange Fadanvis

Jarange Fadanvis

Manoj Jarange on Devendra fadanvis Farmers loan waiving promiss till 30 June : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले. त्यानंतर सरकारने समिती स्थापन करण्यात आली. तातडीने याबाबत शासन निर्णय काढण्यात आला. या निर्णयानंतर नागपूर येथे शेतकरी आंदोलकांनी जल्लोष केला. पण हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका करत सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून मनोज जरांगेंनी हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो. पण आजची परिस्थिती भयानक आहे. 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे ही फसवणूक आहे. आश्वासन देत शेतकऱ्यांना सरकारने फसवल आहे. 30 जून म्हणजे मेला ना शेतकरी तोवर. तुम्ही म्हणतात 6 महिन्यांनी देवू हे जागणारच नाहीत. या अश्वासनावर विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही. मोगलांपेक्षा जास्त सूड भावनेने वागयलं लागलं सरकार. सरसकट कर्जमुक्ती द्या. समित्या बिनित्य काय नाही. समिती बरखास्त करा. नाहीतर नेत्यांना रस्त्यावर फिरू देवू नका.

जरांगेंकडून फडणवीसांवर टीका…

तर यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस असा माणूस आहे. जो एकदा गोड बोलणार आणि दुसरा डाव टाकणार. कमरेला सुरू लावणार. त्यांना एक नाद लागला आहे. ओबीसी आमचा डीएनए त्यांच्यापासून गाड्या लावल्या असतील त्याच्या नोटीस आता सुरू आहेत. त्याने आम्ही जेरीस येत नसतो. तुम्ही किती अन्याय करणार. तिकडून गोड बोलायचं आणि इकडे गोड बोलायचं जाईल राग त्यांनी मराठ्यांच् कल्याण केलं. पण एकीकडे म्हणायच ओबीसी धक्का लागला नाही.एकीकडे म्हणायचं जीआर दिला. मग प्रमाणपत्र कधी देणार ? असा सवाल देखील जरांगे यांनी फडणवीसांना केला आहे.

Exit mobile version