“शिंदे-फडणवीस असते तर त्यांनाही ‘गुंगा गुड्डा’ म्हटलं असतं”; सुनेत्रा पवारांवरील टीकेवर राऊतांचं भाष्य
sunetra pawar gungi gudiya comment sanjay raut reaction सुनेत्रा पवारांवरील काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टीकेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Sunetra pawar gungi gudiya comment sanjay raut reaction: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्यावर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ (Gungi Gudiya) या टीकेवरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांची बाजू काही अंशी मांडली, मात्र बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर त्यांनी मौन बाळगल्याबद्दल सवालही उपस्थित केला. संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांना राजकीय वातावरणाचा अनुभव कुटुंबातून मिळाला आहे. त्यामुळे त्या हळूहळू राजकारणात आपली जागा निर्माण करतील.
‘बीडच्या प्रश्नावर उत्तर द्यायला हवं होतं’
बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला असताना सुनेत्रा पवार यांनी त्यावर भाष्य केले नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ‘गुंगी गुडिया’ अशी टीका करण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पत्रकारांनी विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडायला हवी होती, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंडे इफेक्ट, महाग होणार पनीर पदार्थ; कारण काय?
‘शिंदे-फडणवीस असते तर…’
यावेळी राऊत यांनी सत्ताधारी नेत्यांवरही निशाणा साधला. सुनेत्रा पवार यांच्या जागी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) किंवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) असते आणि त्यांनी अशाच प्रकारे प्रश्नावर मौन पाळले असते, तर त्यांनाही ‘गुंगा गुड्डा’ अशीच टीका सहन करावी लागली असती, असे ते म्हणाले. राजकारणात आल्यानंतर अशा प्रकारच्या टीकेला सामोरं जावं लागतं. मात्र टीकेला शब्दांनी नव्हे तर कामातून उत्तर देणे महत्त्वाचे आहे, असा सल्लाही राऊत यांनी दिला.
काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टिकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं एका वाक्यात उत्तर
इंदिरा गांधींचं उदाहरण देत राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचे उदाहरण दिले. इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी ‘गुंगी गुडिया’ म्हणून हिणवले जात होते. मात्र त्यांनी आपल्या नेतृत्वातून आपण शांत किंवा कमजोर नसून स्वतंत्र विचारांची आणि सक्षम नेता असल्याचे सिद्ध करून दाखवले, असे राऊत म्हणाले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनीही सध्या होणाऱ्या टीकेला आपल्या कामातून उत्तर द्यावे, असे राऊत यांनी सूचित केले.