Tukaram Mundhe : तुकाराम मुंडे इफेक्ट, महाग होणार पनीर पदार्थ; कारण काय?

Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात छापे सुरु असून या कारवाईत लाखो रुपयांचा

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात छापे सुरु असून या कारवाईत लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. तसेच संबंधित व्यक्तींवर देखील कारवाई करण्यात येत आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर अन्न व औषध विभाग अ‍ॅक्शन मोडवर दिसून येत आहे. एफडीएकडून होत असलेल्या या कारवाईचा परिणाम आता बाजारात देखील दिसून येत आहे. तर आता एफडीएने पनीरबाबत मोठा निर्णय घेतल्याने बाजारात पनीरच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात पनीरच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी एफडीएने मोठा निर्णय घेतला आहे. दुधाचा वापर न करता वनस्पतीजन्य तेलांपासून तयार केल्या जाणाऱ्या ॲनालॉग किंवा दुग्धेतर पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर राज्यभरात एक वर्षासाठी पूर्ण बंदी घालण्यात आली असल्याची माहिती एफडीएने दिली आहे.

एफडीएचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, आता राज्यात केवळ शुद्ध दुधापासून बनवलेल्या पनीरच्या (Paneer) विक्रीलाच परवानगी असणार आहे. एफडीएच्या या आदेशानंतर आता हॉटेलमधील पनीर डिशेस महागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026  दरम्यान गोळा करण्यात आलेल्या 308 नमुन्यांपैकी तब्बल 109 नमुने अत्यंत निकृष्ट व भेसळयुक्त आढळले असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.

ॲनालॉग पनीर बंदीच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो – विक्रम पाचपुते

आज अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ॲनालॉग पनीरविरोधात घेतलेल्या कठोर भूमिकेचे आणि बंदीच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. मार्च 2025 च्या विधिमंडळ अधिवेशनात मी ॲनालॉग पनीरचा प्रश्न सभागृहात ठामपणे मांडला होता. पनीरच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू होता. या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या प्रयत्नाला यश आल्याचे समाधान वाटते. हा निर्णय केवळ प्रशासकीय नाही, तर लाखो नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.

राज्यात आजही धो धो पाऊस; नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

माझी शासन व अन्न व औषध प्रशासनाकडे एकच विनंती आहे या बंदीची अंमलबजावणीही तितक्याच कठोरपणे आणि प्रभावीपणे करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली, तरच या निर्णयाचा खरा उद्देश साध्य होईल. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी ॲनालॉग पनीरच्या माध्यमातून सुरू असलेला खेळ आता खऱ्या अर्थाने थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो असं श्रीगोंदाचे आमदार विक्रम पाचपुते म्हणाले.

follow us