किचनमध्ये झुरळे, उंदराची विष्ठा अन् सांडपाणी; द न्यू पूना क्लबला एफडीएचा दणका; अन्न परवाना निलंबित

The New Poona Club: अन्न तयार करण्याच्या परिसरात तसेच साठवणुकीच्या ठिकाणी जिवंत झुरळे, किडे आढळले.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
The New Poona Club In Pune

FDA cracks down on The New Poona Club in Pune : पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रतिष्ठित ‘द न्यू पूना क्लब’च्या ( The New Poona Club) स्वयंपाकघरातील म्हणजे किचनची अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पाहणी केली. त्यावेळी स्वयंपाकघरातील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने या क्लबचा अन्न परवाना निलंबित केला आहे.


पुण्यात बारा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी गणेशस्तोत्र गायनातून रचला जागतिक रेकॉर्ड

जिवंत झुरळे आणि किडे आढळले
अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीदरम्यान धक्कादायक गोष्टी आढळून आल्यात. अन्न तयार करण्याच्या परिसरात तसेच साठवणुकीच्या ठिकाणी जिवंत झुरळे, किडे आढळले. किचनच्या फरशीवर उंदराची विष्ठा, काही भागात साचलेले सांडपाणी तसेच भिंती आणि ओट्यांवर तेलकट थर असल्याचे तपासणीत समोर आले आहे. अन्नपदार्थ ठेवण्यात येणाऱ्या फ्रीजच्या जवळच अस्वच्छ शौचालय निदर्शनास आले.अन्न व्यवसायासाठी लागू असलेल्या स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळल्यानंतर एफडीएने कारवाईचा निर्णय घेतला. अन्नसुरक्षा कायद्यातील शेड्यूल- 4 अंतर्गत असलेल्या निकषांचे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांच्या तपासणीत स्पष्ट झाले.दरम्यान, गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात एफडीएकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पनीर, मिठाई, खवा, खाद्यतेल आणि अन्य अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली.


लव रंजन घेऊन येत आहेत 6 नवे चेहरे, ‘पहला प्यार दूसरी बार’ 23 ऑक्टोबरला होणार रिलीज!


पुणे जिल्ह्यात 14 दुकानांवर कारवाई

या मोहिमेत पुणे शहर आणि ग्रामीण भागातील एकूण 14 खाद्य आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. हडपसर, मोहम्मदवाडी, वानवडी, कोंढवा आणि कॅम्प परिसरासह दौंड, मंचर आणि शिरूर येथील हॉटेल्स, मिठाईची दुकाने, बेकऱ्या आणि रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर आवश्यक माहितीचा अभाव, नियमबाह्य किंवा दिशाभूल करणारे लेबलिंग तसेच अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशयास्पद बाबी आढळल्या. कारवाईदरम्यान सुमारे 56 लाख 36 हजार रुपये किमतीचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली. सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळ आणि अस्वच्छतेविरोधातील तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

follow us