सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदेंची बिनविरोध निवड

Someshwar Cooperative Sugar Factory : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Someshwar Cooperative Sugar Factory

Someshwar Cooperative Sugar Factory : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे तर व्हॉईस चेअरमनपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने 21 पैकी 21 जागा जिंकल्या होत्या. आज 5 नोव्हेंबरला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड होणार होती. सुरुवातीला अध्यक्ष पदासाठी राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, सुनील भगत, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, विक्रम भोसले आणि उत्तम धुमाळ या आठ नावांची चर्चा होती मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदेंची (Rajvardhan Shinde) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे (Sangram Sorte) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव अन् भारतीय शेअर बाजारात तेजी ; सेन्सेक्स 1,500 अंकांनी उसळला

नुकत्याच झालेल्या कारखाना निवडणुकीत राजवर्धन शिंदे यांनी तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा 6,464 मतांनी पराभव केला होता. तर यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुकाचे अध्यक्ष तसेच प्रभारी अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

मुख्य सूत्रधाराला वाचवलं जातंय? प्रदीप पूर्णेकर प्रकरणात अविनाश जाधवांचा गंभीर आरोप

 

follow us