‘सोमेश्वर’साठी तिरंगी फाईट ! काकी-पुतणाला तिसरा खेळाडू जगताप जेरीस आणणार ?

Someshwar Sugar Factory: राष्ट्रवादी काँग्रेसने श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार असे पॅनलला नाव दिले आहे. त्यांना पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांची साथ असणार आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Sunetra Pawar Vs Yugendra Pawar

Someshwar Sugar Factory: सर्वाधिक भाव देणारा कारखाना अशी ओळख असलेला बारामतीमधील सोमेश्वर कारखाना (Someshwar Sugar Factory) बिनविरोध होऊ शकला नाही. अजित पवारांनी भरभराटीला आणलेल्या कारखाना ताब्यात घेण्यासाठी तिरंगी लढत होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पॅनेल, शरद पवार गटाचा पॅनेल आणि तिसरा पॅनेल विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप (Purushottam Jagtap) यांचा आहे. या निवडणुकीत काकीविरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे. त्यात जगताप करिश्मा करताय हे महत्त्वाचे आहे. पण या निवडणुकीत भाजप, शिवसेनेची काय भूमिका आहे. दोघांचा कुणाला पाठिंबा आहे हे जाणून घेऊया…

हा कारखाना बिनविरोध व्हावा, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांची होती. दोन्ही गटाची बैठकही शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी झाली होती. पण त्यात तोडगा निघाला नाही. काल माघारीच्या दिवशी या कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता या कारखान्यासाठी थेट तिरंगी आणि चुरशीची लढत होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलला शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार आणि बंडखोरी केलेल्या विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलचे आव्हान असणार आहे. त्यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.

ऑक्टोबरपासून निष्क्रिय रेशन कार्डांवर कारवाई, ई-केवायसी नसेल तर कार्ड बंद होण्याची शक्यता

कुणाचा कोणता पॅनेल ?
राष्ट्रवादी काँग्रेसने श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार असे पॅनलला नाव दिले आहे. त्यांना पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांची साथ असणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणारे कारखानाचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास असा पॅनल दिला आहेत. जगताप यांना पुरंदरचे माजी आमदार व भाजपचे स्थानिक नेते संजय जगताप यांची साथ आहे. तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनी श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल दिला आहे.


‘दोन पुरुषांसोबत तरुणीला पकडलं अन् मारहाण केली’; पूर्णेकर हत्येप्रकरणी मुलाच्या पुरवणी जबाबातून संशयाचा नवा धागा

पुरुषोत्तम जगताप 13 वर्षे कारखान्याचे अध्यक्ष ?
पुरुषोत्तम जगताप आणि अभिजित काकडे यांच्यात गटात मतभेद झाले. त्यामुळे जगताप यांनी राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल दिलाय. पुरुषोत्तम जगताप हे लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’चे नेतृत्व करत आहे. ते तब्बल 35 वर्षांपासून संचालक आहेत. अजितदादांनी त्यांना तब्बल 13 वर्षे अध्यक्षपदावर ठेवले होते. त्यांच्या पॅनेलमध्ये विद्यमान संचालक विश्वास जगताप, मिलिंद कांबळे, माजी पं. स. सदस्य राहुल भापकर, कारखान्याचे माजी संचालक महेश काकडे, सचिन खलाटे, महेश राणे यांचा समावेश आहे. म्हणजेच जगताप यांचे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वजन दिसून येत आहे. परंतु ते अजितदादांच्या विश्वासामुळे होतं, असं बोललं जात आहे. पुरुषोत्तम जगताप यांनी या निवडणुकीत करिश्मा केला तर दोन्ही पवारांना मोठा धक्का बसू शकतो.

पवार विरुद्ध पवार चौथी निवडणूक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार विरुद्ध पवार अशी ही चौथी निवडणूक असणार आहे. लोकसभेला सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत झाली होती. तर बारामती विधानसभेला अजित पवार विरुध्द युगेंद्र पवार अशी निवडणूक झाली होती. बारामती नगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी विरोधात उतरल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या. आता पुन्हा एकदा कारखान्याचे निवडणूक पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे.

follow us