Download App

मोठी बातमी! 23 सप्टेंबरला अहमदनगर जिल्हा बंद, ‘हे’ आहे कारण

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी (Maratha Reservation) करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी (Maratha Reservation) करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा 17 सप्टेंबरपासून अंतरवली सराटी (Antarvali Sarati) येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सात दिवस पूर्ण होणार आहे मात्र आतापर्यंत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत नसल्याने सकल मराठा समाज अहमदनगरच्या (Ahmednagar Sakal Maratha Samaj) वतीने उद्या 23 सप्टेंबर रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

या संदर्भात अहमदनगर सकल मराठा समाजाकडून जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन देखील देण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट तत्काळ मागे घ्यावेत आणि हैदराबाद, मुंबई, सातारा, गॅझेट लागू करावे या मागणीसाठी 17 सप्टेंबरपासून अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहे.

तर दुसरीकडे मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदनगर सकल मराठा समाजाने देखील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. तसेच 23 सप्टेंबर रोजी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये तसेच नागरिकांनी सुद्धा आपली आस्थापन बंद ठेवावीत असे आवाहन अहमदनगर सकल मराठा समाजाकडून करण्यात आला आहे.

मराठा समाज अन्याय सहन करणार नाही : मनोज जरांगे

तर दुसरीकडे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचं वाटोळ करायला लागले आहे असा गंभीर आरोप केला आहे.

… तर थिएटर मालकांनो महागात पडेल, पाकिस्तानी चित्रपटावरून राज ठाकरेंचा इशारा

तसेच आमचा रस्ता बंद केला आहे. गावातून जाऊ दिलं जात नाही. सध्या मराठ्यांचं शोषण सुरु आहे आणि आता मराठ्यांना वाळीत टाकलं जात आहे मात्र आता मराठा समाज अन्याय सहन करणार नाही आम्ही देखील जशास तसं उत्तर देणार असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.

follow us