Manoj Jarange Patil on Dhananjay Munde : पहिल्यापासून धनंजय मुंडे हा खूपच घोटाळेबाज, लफेडबाज आहे. राज्याला तो मोठा दुर्देवी डाग आहे. गोरगरीबांची, शेतकऱ्यांची, ओबीसींच सहकार्य घ्यायच आणि त्यांच्याच ताटात माती कालवायची हा त्याचा एक पिंड झालेला आहे. गरज आहे तो पर्यंत जवळ घ्यायच, त्यांनाच मग चुरून खायचा. (Jarange Patil) ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे असा थेट घणाघात मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
आधी लोक आता बोलत नव्हते, आता बोलायला लागले. या राज्यातला एक मंत्री एवढा भ्रष्टाचार करत असेल, तर सरकार त्याला जवळ करतच कसं? हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Video : वर्षभरात पावणे तीन कोटींचे पाच घोटाळे; दमानियांनी बाहेर काढले धनंजय मुंडेंचे प्रताप
मी आता मागे लागणारच आहे. मी ज्या- ज्या वेळेस मागे लागतो, तेव्हा माणसाला टेकवितोच त्या शिवाय आपण गप नाही बसतं. आपण टेकविणार म्हणजे टेकविणार. त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीने घडवून आणलय. त्याला आता सुट्टी नाही. आज माझ्या काही तपासण्या आहेत. उद्या सुट्टी घेतल्यानंतर मी अंतरवली सराटीत जाऊन दर्शन घेणार, त्यानंतर शहागंज अंकुशनगरला जाणार आहे. त्यामुळे मी आता बरोबर टप्याटप्याने मागे लागतोय असंही ते म्हणाले आहेत.
बीड जिल्ह्याला हा मोठा कलंक आहे. बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल. आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय, याच्यात जाती- पाती ओबीसीची संबंध नाही. पाप करायचं, गोरगरीब शेतकऱ्यांचा विमा खायचा. गोरगरीबांना मिळून द्यायच नाही, गोरगरीबांचा कैवारी असं बीड जिल्ह्याला दाखवायचं. आता जनतेचे डोळा उघडतील. बीडची जनता धनंजय मुंडेला माफ करणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मागच्या दोन अडीच वर्षात मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोललो नाही. परंतु, ते आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांचं नाव घ्यावं लागतय. आज धनंजय मुंडे यांच्याविषयी इतके पुरावे असताना तुम्ही धनंजय मुंडेवर कारवाई करत नाहीत. का त्याला पोसता? जर इतकं सगळे आरोप होत असताना आपण त्याच्यावर कारवाई होत नसेल तर आम्हाला आता अजित पवार यांच्यावर शंका यायला लागली आहे असाही थेट घणाघात केला आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे हा बाहेर राहून पुरावे नष्ट करत आहे. जर एखादा आरोपी सुटला तर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जबाबदार धरू असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.