Download App

सरकारनं घेतला मोठा निर्णय! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, नक्की काय घडलं?

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षक आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. (Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होणार होतं. मात्र उच्च न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर अजूनही ठाम आहेत. आम्ही 27 तारखेला मुंबईच्या दिशेनं निघणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आम्ही न्यायालयाचा सन्मान करणारे लोक आहोत, आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे, आम्हाला नक्की न्याय मिळेल, आमच्याकडेही वकील बांधवांची टीम आहे, ती न्यायालयात जाईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.  दरम्यान सरकारने गोरगरिबाचा अंत पाहू नये.

Video : येवल्यावाला लई खौट अन् आतल्या गाठीचा, जरांगेंचा भुजबळांवर तिखट प्रहार

आमचं आंदोलन हे लोकशाहीच्या मार्गानं होणार आहे, आणि कोणालाही लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन करण्यापासून रोखता येत नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या आरक्षण देण्याचं जीवावर आलं आहे, असा आरोपही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान, आता या आंदोलनाबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत पुन्हा एक बैठक होणार आहे. येत्या दोन दिवसात महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वेळ पडल्यास मराठा आरक्षणासंदर्भातली उपसमिती जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यावेळीही जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे, मात्र या संदर्भातील अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अझाद मैदानावरील आंदोलनाला हाय कोर्टानं परवानगी नाकारली आहे, तर दुसरीकडे सरकारकडून देखील मनोज जरांगे पाटील गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

follow us