लोणावळा : मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंचा (Manoj Jarange) मोर्चा लोणावळ्यात दाखल झाला आहे. मुंबईकडे कूच करण्यापूर्वी जरांगेंनी लोणावळ्यात एका सभेला संबोधित केले. यात त्यांनी आंदोलकांना नेमकं काय करायचं काय नाही करायचं यावर मार्गदर्शन करत जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या सर्वांना मुंबईत जायचचं असल्याचे सांगितले आहे. मात्र, मुंबईत दाखल झाल्यानंतर काही गोष्टींचं भान ठेवण गरजेचं असल्याचे जरांगे म्हणाले. उपस्थितांना संबोधित केल्यानंतर जरांगे सरकारकडून आलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत. उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना जरांगेंनी झोप अपुरी होत असल्याने होणाऱ्या शाररिक त्रासाबद्दलही भाष्य केले यावेळी आंदोलक काहीसे भावुक झाले होते. (Manoj Jarange Patil Speech In Lonawala)
Maratha Reservation : धक्कादायक! पहिली पास कर्मचाऱ्यावर मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी…
स्वयंसेवक म्हणून काम करा
उपस्थितांना संबोधित करताना जरांगे म्हणाले की, उद्यापासून सर्वांनी स्वयंसेवक म्हणून काम करा. हे काम करत असताना आजू बाजूला काय सुरू आहे यावर बारीक लक्ष ठेवण्याचं काम सर्वांनी करायचं आहे. आंदोलनात कुणी जाळपोळ किंवा उद्रेक करण्याचा प्रयत्न करतोय का यावरदेखील सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना जरांगेंनी यावेळी दिल्या आहेत. जो कुणी आंदोलनाला गालबोल लावण्याचा प्रयत्न करेल त्याला पळून न जाऊ देता एकत्र येत त्याला जेरबंद करायचं आहे. हे करताना संबंधित व्यक्तीला कुणीही मारहाण न करता थेट पोलिसांच्या स्वाधिन करायचं आहे.
दडपशाही करण्यात आली तर, जागेवर उत्तर देऊ नका
मुक्कामाच्या ठिकाणी कितीही थंडी वाजली किंवा त्रास झाला तरी, आपली वाहनं ज्या ठिकाणी लावलेली आहेत तिथेच सर्वांनी आराम करायचा आहे. सरकारकडून कुणावर दडपण आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्यास तुम्ही त्यांना उत्तर देऊ नका. घडलेल्या घटनेबद्दल मला कल्पना द्या, मात्र, कल्पना न देता थेट उत्तर देऊ नका असे आदेश जरांगेंनी मराठा आंदोलकांना दिले आहेत.
आरक्षण मिळाल्यावर सर्व हिशोब चुकता करणार
मुंबईत आपल्याला शांततेत एका जागी खाऊन पिऊन आंदोलन करायचे आहे. शांततेत आंदोलन करून इतिहास घडवायचा आहे. सरकारने दडपण आणलं तरी शांत रहायचं. शांततेत खूप ताकद असते असे मनोज जरांगे म्हणाले. शांततेत आंदोलन करून इतिहास घडवायचा आहे. सरकारने दडपण आणलं तरी शांत रहायचं. शांततेत खूप ताकद असते असे मनोज जरांगे म्हणाले. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यावर सगळा हिशोब घेणार असल्याचे जरांगे म्हणाले.
पाय सुजलेत, वात आलाय; जरांगेंच्या व्याधींनी उपस्थित भावुक
आंदोलनाची पुढच्या दिशा ठरवून देताना जरांगेंनी त्यांना होत असलेल्या शाररिक त्रासाबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, लोणावळ्यात सकाळी 10 वाजता सभा होणार होती. पण यायला उशीर झाला. गाडीतच काल मला झोप लागली. लोणावळ्यात यायला सकाळचे सात वाजले असे सांगत गेल्या दोन दिवसांपासून झोप नाहीये. त्यामुळे पाय सुजलेत, वात आल्या सारखं वाटतंय म्हणून उशीर झाल्याचे जरांगेंनी सांगितले. त्यांच्या या त्रासाबद्दल ऐकतान उपस्थित जनसमुदाय काहीसा भावुक झाला होता.
द्रुतगती मार्गावर RPF तैनात
दुसरीकडे मुंबईत दाखल होण्यासाठी जरांगे आणि आंदोलक मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने जाणार आहेत. मात्र, पोलिसांकडून जरांगेंना मोर्चा जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे. परंतु, अद्याप जरांगेंकडून याला होकार देण्यात आलेला नाही. ही सर्व परिस्थिती बघाता नवीन मुंबई-पुणे द्रुतगती महार्गावर पोलिसांसोबतच RPF चा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
#WATCH | Maharashtra | Heavy security deployed at both entry and exit points of Mumbai-Pune Expressway at Lonavala. Rapid Action Force and bomb disposal squad also stationed.
Maratha reservation supporters wanted to go towards Mumbai via Mumbai-Pune Expressway but the Police… pic.twitter.com/9Y9VeXJKTN
— ANI (@ANI) January 25, 2024