Download App

मोठी बातमी! जरांगे पाटील मुंबईत पोहोचण्यापूर्वीच सरकारचा तोडगा? शिष्टमंडळाची धाव, नवं ट्विस्ट…

Manoj Jarange Patil Maratha Aandolan Mumbai : मराठा आरक्षणाचा (Maratha Aandolan) प्रश्न पुन्हा पेटला असून, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटी येथून महादेवाचे दर्शन घेऊन आणि गणपती बाप्पाची आरती करून मुंबईकडे कूच केली. हायकोर्टाने मुंबईत मोर्चासाठी (Mumbai Morcha) परवानगी नाकारली असतानाही त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

सरकारवर जरांगेंचा आरोप

मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. त्यांच्या मते, नवीन कायद्याच्या आधारे सरकारने हायकोर्टात मोर्चाविरोधात धाव घेतली, पण याची माहिती मराठा समाजाला दिली नाही. साधी नोटीसही न देता आमची बाजू न ऐकता निर्णय घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. न्यायालय आमचं म्हणणं ऐकेल आणि न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, “हे सरकार हिंदुत्ववादी असल्याचा दावा करतं, मग मराठे हिंदू नाहीत का? आता खरा प्रश्न म्हणजे सरकार मराठ्यांना आरक्षण देतं की नाही, असे म्हणत त्यांनी आरक्षणाचा चेंडू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टोलावला.

टॅरिफ बॉम्बचा पहिला धक्का! भारतीय कापड उद्योग संकटात, नोएडा-सुरत-तिरुपूरमधील कारखाने बंद

सरकारी शिष्टमंडळाची भेट

या पार्श्वभूमीवर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकारी शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्यही सहभागी होणार आहेत.पूर्वी या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते, परंतु आता अध्यक्षपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना सरकारच्या प्रयत्नांची माहिती देईल आणि चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, उपसमितीच्या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मी गोळ्या खायला तयार, पण मागे हटणार नाही; मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे ठाम

जरांगे पाटलांची मोठी अट

सरकारी प्रतिनिधींशी चर्चा करण्यास तयार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, “ही चर्चा बंद दाराआड होणार नाही, तर सर्वांसमोर होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. मुंबईत मोर्चासाठी परवानगी नाकारल्यानंतरही हालचाली सुरू आहेत. प्रशासन पातळीवर आझाद मैदानावर मर्यादित संख्येने आणि ठराविक अटींवर मोर्चाला परवानगी दिली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सरकार मोर्चा मुंबईत न येण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करत असल्याचे कळते.

 

follow us