Download App

Jarange Exclusive : एकीकडे आंदोलनाचे शस्त्र तर, दुसरीकडे फडणवीसांवर बोलताना नरमाईची सूर

जर फडणवीसांना आमचा राग नसेल, द्वेष नसेल, आकस नसेल तर ते आमच्या मागण्यांची अंमलजबावणी करतील. आता कळेल कोण मराठ्यांच्या ताटात विष कालवतंय?

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं. आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जरांगे आज पुन्हा उपोषणाला बसलेत. ते अंतरावालीत सातव्यांदा उपोषण करत आहेत. दरम्यान, यावेळी लेट्सअप मराठीशी संवाद साधतांना त्यांनी सगेसोयरे जीआर लागू करावा, शिंदे समितीला (Shinde committee) मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

‘व्होटर डे’ बनला ‘चिटर डे’!मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा, ECकडून जनतेची फसवणूक; कॉंग्रेसचे टीकास्त्र 

मराठे एकसंध…
मनोज जरांगे म्हणाले, सगेसोयरे जीआर लागू करावा, शिंदे समितीला मुदतवाढ या आमच्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी. त्यातच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं हित आहे. आंदोलनस्थळी गर्दी झाली नाही, असं बोलल्या जातं. मात्र, आधीच्या आंदोलनापेक्षा डबल संख्येने मराठे आंदोलनस्थळी दाखल झालेत. मी काही मराठ्यांचं वाईट करत नाही. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठीच लढतोय. त्यामुळं सगळे आपापले कामधंदे सोडून अंतरवलीत आलेत, समाज एकसंध आहे, हे मराठ्यांनी राजकारण्यांना दाखवून दिलं, असं जरांगे म्हणाले.

आधी देवेंद्र फडणवीसांवर तुम्ही टीका करायचे. आता तुमची भाषा नरमली, असं विचारलं असता जरांगे म्हणाले की, मी जाणूनबूजून फडणवीसांना बोलत नाही. मात्र, शिंदे समिती गठीत झाली होती, त्या समितीला मुदतवाढ न देता काम बंद करण्यात आलं होतं. जातीयवादी अधिकाऱ्यांनी नोंदी असूनही ओबीसी प्रमाणपत्रे रोखली. कक्ष स्थापन केले होत, तेही बंद केले होते. सातारा, हैदराबाद गॅझेटमध्ये मराठे हेच कुणबी असल्याच्या नोंदी आहेत. मग तरीही मराठ्यांना ओबीसी आरक्षण का दिलं जात नाही? हा माझा सवाल आहे, असं जरांगे म्हणाले.

सहा महिन्यांत तब्बल 48 लाख मतदार आकाशातून पडली का? आज व्होटर डे नसून चिटर डे, काँग्रेसचा ECI वर गंभीर आरोप 

पुढं ते म्हणाले, आमच्या मागण्या जुन्याच आहेत. फक्त त्या नव्याने मांडल्या यामध्ये नवीन काही नाही. आणि सरकारही जुनचं आहे. ते फक्त नव्याने सत्तेत आलं. त्यामुळं फडणवीस सरकार समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वासही जरांगेंनी व्यक्त केला. आता कोणाला मराठ्यांचा राग आहे? कोण मराठ्यांच्या अन्नात विष कालवतंय हे क्लिअर होईल, असंही जरांगे म्हणाले.

सातारा संस्थान, हैद्राबाद गॅझेट लागू करण्यात यांव. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावं. जर फडणवीस साहेबांना आमचा राग नसेल, द्वेष नसेल, आकस नसेल, आमचे लेकंर मोठे व्हावेत, असं वाटतं असेल तर ते आमच्या मागण्यांची अंमलजबावणी करतील. आणि त्यांना मराठ्यांची चीड असेल तर आरक्षण देणार नाहीत. मात्र, आम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजाणी झाल्याशिवाय, आता मागे हटणार नाही, असं जरांगे म्हणाले.

follow us