Manoj Jarange Patil Reaction On Parbhani Violence : परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर तेथे आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत जाळपोळ अन् दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) नावाच्या आंदोलकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. घटनेनंतर सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात मोठे धक्कादायक खुलासे झाले आहेत. यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची प्रतिक्रिया समोर आलीय.
मनोज जरांगे म्हणाले की, परभणीमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दु:खदायी आहे. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुषपणे मारहाण केलीये. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देखील त्यांना मारहाण करण्यात आले असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. हा प्रकार अत्यंत (Maharashtra Politics) गंभीर आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन, यामध्ये जे दोषी असतील त्या पोलिसांवर देखील कारवाई करावी. गुन्हा दाखल करावा.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढू. बीडमध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना तात्काळ ताब्यात (Parbhani Violence) घ्यावे. आरोपी आमदार असो की खासदार असो अथवा मंत्री असो तो गजाआड गेलाच पाहिजे. ही त्या कुटुंबाची मागणी आहे. ती पूर्ण झालीच पाहिजे. मयत संतोष देशमुख यांच्या मुलीने 28 तारखेला मोर्चाचे आवाहन केले आहे. त्यामुळे सर्व पक्षातील नेत्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे. यामध्ये कुठलेही राजकारण करू नये, असं जरांगे म्हणाले आहेत.
शिंदेंच्या शिलेदाराचे गृहखात्यावर गंभीर आरोप, थेट पोलीस आयुक्तांनाच धाडलं पत्र
संतोष देशमुख मृत्यू प्रकरणात कुणाला सुट्टी देणार नाही. जोपर्यंत आरोपीला ताब्यात घेणार नाहीत. तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. सरकार या प्रकरणातील आरोपीला पाठीमागे घालण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने या प्रकरणात न्याय करावा, नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल. स्वतःच न्याय करून ते सरकारला परवडणारे नाही. या प्रकरणातील आरोपीला पाठीमागे घालण्याचे काम देखील सरकारकडूनच केले जात आहे, त्यामुळे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीला ताब्यात घ्यावी.
सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi Death) यांच्या कुटुंबीयांनी जी माहिती दिली आहे, ती माहिती अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी त्यांना अमानुष मारहाण केली आहे. पोलीस कोठडीत असताना जर कोणत्या युवकांनी जेवण मागितले, तर पोलीस कर्मचारी त्यांना मारहाण करत होते. आता पोट भरली आहे का अशी विचारणा करत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितलं असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहेत.