ऑडिओ क्लिप प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा हात? मनोज जरांगेंचं वक्तव्य  

Manoj Jarange :  ऑडिओ क्लिप प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारर्कीर्द संपवण्याचा डावा होता. या प्रकरणात एआयला पुढे करुन

Manoj Jarange

Manoj Jarange

Manoj Jarange :  ऑडिओ क्लिप प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारर्कीर्द संपवण्याचा डावा होता. या प्रकरणात एआयला पुढे करुन भाजपला पळवाट करता येणार नाही. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवण्यात आले होते का? ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या लोकांच्या मागे देशातील कोणी बडा नेता आहे का याचा शोध एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे आम्ही त्यांना मदत करु असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले.

जालन्यात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, या प्रकरणानंतर एकनाथ शिंदे गप्प बसणार नाहीत. हा त्यांच्यावर वैयक्तिक घाव आहे. त्यांचे करिअर संपवण्याचा डाव होता का? मला कालची माहिती आहे की, यात फडणवीस साहेबांना माहिती न होता त्यांनी हे केलेले आहे. फडणवीससाहेब खोलात गेले तर त्यांच्या आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात गेम होता हे लक्षात येईल. क्लिपमध्ये (Audio Clip Inciden) बोलणारे लोक कोणाचे, ही कोणाची यंत्रणा आहे. यांच्या पाठीवर कोणाचा हात आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही बैठक आहे त्यामधून दिसून येते की, ते प्लॅनिग करतात, नरेटिव्ह सेट करतात. यांच्या पाठीशी दिल्लीतून हात असला पाहिजे. भाजपमध्ये (BJP) मोठी संस्था यांच्या पाठिशी असावी. माझ्याविरोधात बोलणारे सगळ्यांना नोटा देण्यात येत आहे असा आरोप माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी केला.

‘अर्णव’ येतोय.., पाच राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा ; NDRF तैनात

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली नाही तर संपूर्ण प्रकरणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाच हात होता असा संदेश जाईल. माझ्याकडे कोणतंही यंत्र नाही, मी एआय व्हिडिओ कसा तयार करणार? तुम्ही कशालाही एआय म्हणणार का? या सगळ्यात भाजपचे लोक होते मात्र ही गोष्ट देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती की नव्हती हाच प्रश्न आहे असं देखील यावेळी मनोज जरांगे म्हणाले.

Exit mobile version