आंदोलना आधी प्रमाणपत्र द्या अन्यथा सगळ्यांना पट्ट्यावर घेईल; जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा

Manoj Jarange यांनी यावेळी सरकारला आणि विशेषत: मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा देखील दिला आहे.

एसआयटी चौकशी रद्द केली फक्त शेंगा हाणल्या; जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर संशय

एसआयटी चौकशी रद्द केली फक्त शेंगा हाणल्या; जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर संशय

Manoj Jarange warn Devendra Fadanvis for Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि संबंधित मागण्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी आज 16 मे 2026 रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या आगामी आंदोलनाची तारीख जाहीर केली. तसेच यावेळी सरकारला आणि विशेषत: मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा देखील दिला आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?

आज मी फक्त पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहे. पण आजच मराठा बांधवांनी आंदोलनासारखी गर्दी केली आहे. हे पाहून मन भरून आलं. हा समाजाचा माझ्यावरील विश्वास आहे. तसेच आपण नेहमी म्हणतो की, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. पण मराठा हा समाज असा ज्याच्या पुढे सरकारचा शहाणपणा चालला नाही. त्यामुळे सरकारला मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही.

Mamachya Govyala Jaauya : ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित

त्यामुळे भाजपच्या विरूद्ध सर्व पक्ष समाजासाठी एकत्र आले आहेत. कारण त्यांना पक्षासोबत मराठा समाज देखील मोठा करायचा आहे. पण या सरकारने मराठा समाजाची वारंवार फसवणूक केली आहे. मात्र आता जून महिन्यात अनेक लेकरांच्या एडमिशन आहे. अनेकांचे एडमिशन थांबू शकते. त्यामुळे ही बैठक आहे. आपली पिढी गेली पण येणाऱ्या पिढीला सुख देऊ.

NEET Paper Leak : एका ‘खोडकर’ विद्यार्थ्याने असा फोडला कुलकर्णीचा सेट केलेला ‘मास्टर’ प्लॅन!

मुंबई येथे पावसात झोडपलं पण मराठा मागे नाही हाटला. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाही, पण माझ्या समाज सुखी करायचा आहे. मात्र माझा त्यांना प्रश्न आहे की, जर तुम्ही जर जीआर काढला होता तर फडणवीस साहेब तुम्ही आमचे प्रमाण पत्र का रोखले? कारण अधिकारी हैदराबाद गॅझेटिअरनुसार आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत. ते सरकारने तसं सांगितलं असल्यांचं सांगतात. त्यामुळे त्याला जबाबदार हे देवेंद्र फडणवीसच आहेत.

EGR Trading : आता खरेदी करता येणार 100 मिलिग्रॅम सोनं; NSE 18 मे पासून सुरु करणार EGR ट्रेडिंग

आधिवेशनात त्यांनी भाषणात म्हटले की, मंत्र्यांना किंमत नाही. सर्व काही मुख्यमंत्रीच सर्व चालवतात. त्यामुळे प्रमाणपत्र फडणवीसांनीच रोखले. त्यामुळे आंदोलनाच्या अगोदर सर्वांना प्रमाणपत्र द्यावे. सातारा संस्थानचा देखील काढा. मी आजच तुम्हां गोड बोलतो नाहीतर आंदोलन सुरू झाल्यावर सगळ्यांना पट्ट्यावर घेईल.

 

Exit mobile version