जरांगेंच्या प्रकृतीबाबत अपडेट; तपासणी अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार
मनोज जरांगेंची प्रकृती बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी चार दिवस विश्रांतीचा सल्ला दिला.
Manoj Jarange Patil Health Condition : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. अशक्तपणा, ताप आणि थंडीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तुकाराम मुंढेंचा फोटो घराघरात; ग्रामस्थांनी केले मुंढेंच्या कार्याचे कौतुक
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून जरांगे पाटील यांना ताप आणि थंडी जाणवत होती. त्यातच अशक्तपणाही वाढल्याने कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना उपचारांसाठी तातडीने छत्रपती संभाजीनगरला आणले. त्यानंतर त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोनिया गांधींनी वंदे मातरम गाण्यापासून रोखले? ‘हा दिमागी नक्षलवाद’ फडणवीसांची टीका
प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्यामध्ये 102 अंश तापासह टायफॉइडसदृश लक्षणे आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, त्यांची नेमकी प्रकृती आणि आजाराचे स्वरूप स्पष्ट होण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या रक्ताचे नमुने विविध चाचण्यांसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या तपासण्यांचे अहवाल आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँक निवडणूक, विखे-थोरातांची सहमती एक्स्पेस, राम शिंदेंचे स्थान काय?
दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना किमान पुढील चार दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही ; शिवसेना-धनुष्यबाण शिंदेंचाच; संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
पश्चिम महाराष्ट्रातील दौरा, सततच्या बैठका आणि विविध ठिकाणी झालेल्या भेटीगाठींनंतर जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा समर्थकांकडून व्यक्त होत आहे.