तुकाराम मुंढेंचा फोटो घराघरात; ग्रामस्थांनी केले मुंढेंच्या कार्याचे कौतुक

कुऱ्हा ग्रामपंचायतीने तुकाराम मुंढेंच्या अन्न भेसळविरोधी कारवाईचे कौतुक करत ग्रामस्थांना घरात त्यांचा फोटो लावण्याचे आवाहन केले.

Tukaram Mundhe’s Photo

Kurha Gram Panchayat Urges Residents to Display Tukaram Mundhe’s Photo at Home : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात अन्नातील भेसळखोरीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई करत त्यांनी अन्न सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रशासनाची भूमिका अधिक कडक केली आहे. त्यांच्या या कारवाईचे अनेक स्तरातून कौतुक होत असून, सोशल मीडियावरही तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीची चर्चा होत आहे.

सोनिया गांधींनी वंदे मातरम गाण्यापासून रोखले? ‘हा दिमागी नक्षलवाद’ फडणवीसांची टीका

तुकाराम मुंढे ज्या विभागात काम करतात, त्या विभागात ते आपल्या कार्यशैलीची वेगळी छाप पाडतात. त्यामुळे ‘ते ज्या विभागात जातात, तथे काम चोख करतात’, अशी भावना अनेक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा आणि कठोर निर्णयक्षमतेमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. अन्न भेसळीविरोधातील त्यांच्या मोहिमेमुळे सामान्य नागरिकांमध्येही त्यांच्याविषयी सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

इमरान हाश्मी दमदार, नॉस्टॅल्जिया बहारदार, पण फिल्म सुमार…

याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ग्रामपंचायतीने एक अनोखे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना आपल्या घरात तुकाराम मुंढे यांचा फोटो लावण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारी अधिकाऱ्याच्या कामाचे कौतुक करण्यासाठी थेट त्यांच्या छायाचित्राला घरात स्थान देण्याचे आवाहन करण्यात आल्याने या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे. अन्नातील भेसळ रोखण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईला पाठिंबा देण्याचा आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा हा एक अनोखा प्रयत्न असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येत आहे.

कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही ; शिवसेना-धनुष्यबाण शिंदेंचाच; संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? 

विशेष म्हणजे, एखाद्या सरकारी अधिकाऱ्याचा फोटो प्रत्येक घरात लावण्याचे आवाहन करणारी ही पहिली ग्रामपंचायत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे कुऱ्हा ग्रामपंचायतीच्या या आवाहनाची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या अन्न भेसळविरोधातील कारवायांमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांच्या या धडक मोहिमेला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आणि कुऱ्हा ग्रामपंचायतीचे हे अनोखे आवाहन यामुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

follow us