इमरान हाश्मी दमदार, नॉस्टॅल्जिया बहारदार, पण फिल्म सुमार…
Aawarapan च्या जखमी नायकाचा करिश्मा, ‘तेरा मेरा रिश्ता’ची नॉस्टॅल्जिया आणि दिशाचा फसलेला अभिनय... ‘आवारापन 2’ मध्ये जुनं प्रेम आहे
Movie Review of Aawarapan Emraan Hashmi is strong, nostalgia is strong, but the film is about : इमरान हाश्मीच्या जखमी नायकाचा करिश्मा, ‘तेरा मेरा रिश्ता’ची नॉस्टॅल्जिया आणि दिशाचा फसलेला अभिनय… ‘आवारापन 2’ मध्ये जुनं प्रेम आहे, पूर्वीचा गडद अंधार आहे; पण पूर्वीची जादू आहे का? काही सिनेमे येऊन जातात… पण त्यांच्या आठवणी मनात रेंगाळतात…2007 मध्ये आलेला ‘आवारापन’ असाच एक सिनेमा. बॉक्स ऑफिसवर त्यावेळी फार मोठा चमत्कार न घडवणारा हा चित्रपट पुढच्या काही वर्षांत प्रेक्षकांच्या मनात घर करत गेला. इमरान हाश्मीचा जखमी चेहरा, प्रेमासाठी स्वतःला पणाला लावणारा नायक, दर्दभरे संवाद आणि त्याहूनही जास्त काळ मनात रेंगाळणारं संगीत…
देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी, ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार
‘आवारापन’ हळूहळू सिनेमा न राहता एक पिढीची भावना बनून गेला… आता जवळपास दोन दशकांनंतर इमरान हाश्मी पुन्हा शिवम पंडितच्या रूपात परतला आहे. प्रश्न एकच… हे परतणे खरंच ‘आवारापन’साठी आहे की केवळ जुन्या नॉस्टॅल्जिया encash करता येईल… उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे.
कथा काय आहे?
यावेळी शिवम पंडित भारतात नाही, तर थेट बँकॉकमध्ये आहे. त्याने वाढवलेली एक लहान मुलगी अनाथाश्रमातून अपहरण होऊन मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकते. त्या मुलीचा शोध घेण्यासाठी पंडित पुन्हा एकदा त्याच अंधाऱ्या दुनियेत उतरतो, जिथे हिंसा, गुन्हे आणि मृत्यू यांच्याशी त्याची जुनी ओळख आहे. या प्रवासात त्याची भेट होते दिशा पटानी… झाराशी. गँगस्टर कुटुंबात जन्मलेली, स्वतःच्या भूतकाळाच्या जखमा घेऊन जगणारी आणि सेलो वाजवणारी झारा पंडित त्याच्या आयुष्यात भावनिक आधार बनते. कथा ऐकताना सगळं अगदी ‘आवारापन’च्या विश्वाला साजेसं वाटतं. पण समस्या अशी की… ही कथा नवीन नाही…
इमरान हाश्मी हे या फिल्मचे शक्तिस्थान…
‘आवारापन 2’ची खरी ताकद म्हणजे कथा नाही. ती आहे…इमरान हाश्मी. पडद्यावर इमरान येतो आणि काही सेकंदांत चित्रपटाची एनर्जी बदलून जाते. त्याचा लूक, शांतपणे बोलण्याची पद्धत, डोळ्यांमधली वेदना, अचानक उसळणारा राग आणि अॅक्शनच्या प्रसंगातील तीव्रता… इमरानला फार काही करण्याची गरजच पडत नाही… तो फक्त पडद्यावर उभा राहतो आणि ‘पंडित’ जिवंत होतो. पंडित ही काही फार गुंतागुंतीची व्यक्तिरेखा नाही. भूतकाळात जखमा, वर्तमानात ध्येय आणि न्यायाची स्वतःची व्याख्या…इतकंच. पण इमरान या परिचित व्यक्तिरेखेला अशी भावनिक खोली देतो की, प्रेक्षक पुन्हा त्याच्यासोबत चालायला लागतो. आणि इथेच Awarapan 2 जिंकतो.
मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांना सरकारचा संदेश; कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही
इमरान हाश्मीला त्याचे हुकमी कार्ड्स खेळायला दिले की, तो अजूनही कमाल करू शकतो. दिशा पटानी : सुंदर दिसणं आणि व्यक्तिरेखा जगणं यात फरक असतो! झारा या व्यक्तिरेखेकडून खूप अपेक्षा होत्या. भूतकाळ आहे, कुटुंबाची गुंतागुंत आहे, भावनिक संघर्ष आहे आणि पंडितसोबत विकसित होणारं नातं आहे. म्हणजे एका अभिनेत्रीला आपली छाप सोडण्यासाठी आवश्यक सगळं काही आहे.
उरीतील कामन अमन सेतूवर सैफ अली खानची जवानांशी भेट
पण पडद्यावर मात्र… दिशा पटानीची व्यक्तिरेखा जितकी मोठी लिहिली आहे, तितकी ती अभिनयातून उभी राहत नाही. ती सुंदर दिसते. स्टायलिश दिसते. पण भावनिक प्रसंगांमध्ये चेहऱ्यावर अपेक्षित चढ-उतार जाणवत नाहीत. पंडित तिचा हात धरतो तेव्हा प्रेम जाणवायला हवं. पण तिथे फारसं काही जाणवत नाही. ती त्याच्यासोबत असल्याचं सांगते तेव्हा प्रेक्षकांनी तिच्यासोबत उभं राहायला हवं. पण तसं होत नाही. आणि त्यामुळे इमरानला पुन्हा एकदा अभिनयाची अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागते. रोमान्स आहे… पण ‘आवारापन’ची आग नाही! हा चित्रपट इमरान हाश्मीचा आहे, त्यामुळे प्रेक्षकांना प्रेम, वेदना आणि थोडीशी उत्कटता अपेक्षित असणं साहजिक आहे.
लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमाला राहुल गांधी अनुपस्थित, कारण काय? पवन खेडा स्पष्टच बोलले …
पंडित आणि झारा यांच्यात प्रेम फुलतं. पण त्यात ती भावनिक किंवा शारीरिक ठिणगी निर्माण होत नाही, जी या कथेला आवश्यक होती. विशेष म्हणजे या नात्याला अधिक उत्कट करण्यासाठी पुरेशी जागा ठेवली होती. पण चित्रपट नेमका जिथे अपेक्षित वळणे घ्यायला हवा होता, तिथे तो थांबतो… थबकतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात एकच विचार येतो…
‘इतका अंधार दाखवला, मग प्रेमात थोडी आग का नाही?’
खलनायक पाहून हिरोची भीती वाटत नाही… जोरावरच्या भूमिकेत पुरण गब्बी ठीक आहे; पण व्यक्तिरेखेत अपेक्षित धोकादायकपणा नाही. इमरानसमोर उभा राहिल्यावर हा माणूस खरंच पंडितला आव्हान देईल का, असा प्रश्न पडतो. पहिल्या आवारापनमधील आशुतोष राणाच्या खलनायकाची आठवण इथे सतत होते. त्या खलनायकात एक स्टाइल होती, एक धोकादायक शांतता होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंडितसाठी तो खरोखर धोका वाटायचा. इथे मात्र पंडितसमोरचा संघर्ष… आव्हान तितके मोठे आणि रोमांचक होत नाही.
पण जोरावरचा साथीदार जयदीपच्या भूमिकेतील सुविंदर विकी मात्र लक्ष वेधून घेतो. त्याचा अभिनय शांत आहे, पण प्रभावी आहे. तो ‘मी खलनायक आहे’ असं ओरडत नाही. तो फक्त तसा वागतो. आणि म्हणूनच तो अधिक धोकादायक वाटतो… शबाना आझमींचा वाया गेलेला अनुभव शबाना आझमींसारखी अभिनेत्री चित्रपटात आहे आणि तरीही त्यांच्या व्यक्तिरेखेला पुरेसं महत्त्व मिळत नाही, ही Awarapan 2ची मोठी कमतरता आहे.
नफिसा ही व्यक्तिरेखा कथेत महत्त्वाची असल्याचं चित्रपट आपल्याला सतत सांगतो. पण दाखवतो किती? फारच कमी. त्यामुळे शबाना आझमींसारख्या अभिनेत्रीची क्षमता अक्षरशः वाया गेल्याची भावना निर्माण होते. विशेषतः दिशा पटानीसोबतचे काही प्रसंग पाहताना दोन्ही अभिनेत्रींच्या अभिनयातील फरक प्रकर्षाने जाणवतो. एका बाजूला अभिनयाची दशके असलेली शबाना आणि दुसऱ्या बाजूला भावनिक प्रसंगात अडखळणारी दिशा… हा विरोधाभास टाळता आला असता. आणि मग येतं ‘तेरा मेरा रिश्ता’… इथे Awarapan 2 अचानक तुमच्या मनावर हल्ला करतो. जुनी गाणी म्हणजे या चित्रपटाची सर्वात मोठी भावनिक ताकद.
विशेषतः ‘तेरा मेरा रिश्ता’ ऐकू येतं आणि अचानक तुम्ही 2026 मधून तुम्ही थेट पोहोचता ते 2007 मध्ये… पंडितभोवती साधूंचा समूह, पार्श्वभूमीवर जुनं गाणं आणि पडद्यावर इमरान… हा क्षण तर्कापेक्षा भावनेवर चालतो. आणि त्या क्षणी प्रेक्षकाला पटकथा किती परफेक्ट आहे, याचा विचार करायची गरजही वाटत नाही. कारण आठवणी कधी तर्काने चालतात का? पटकथा : जुना फॉर्म्युला, नव्या पॅकेजिंगमध्ये मानवी तस्करी, सूड, प्रेम, अॅक्शन, आध्यात्मिकता, भूतकाळातील जखमा आणि नायकाचा आत्मशोध… सगळं काही आहे…
त्या तोंडात मिसरीचा बुकणा भरणाऱ्या बायकांकडेही लक्ष द्या; चिमुकल्याचं तुकाराम मुंढेंना आवाहन
पण या सगळ्यांना एकत्र बांधणारी पटकथा मात्र तितकी मजबूत नाही. काही व्यक्तिरेखा अर्धवट वाटतात… काही प्रसंग अंदाज बांधता येण्यासारखे आहेत. काही नाट्यमय क्षण तर इतक्या मोठ्या आवाजात येतात की त्यांच्यासोबत ‘इमोशनल बॅकग्राउंड म्युझिक’ची गरजच उरत नाही. पण प्रत्येक निर्णायक क्षणी चित्रपट डगमगतो… इमरान परत येतो. आणि पुन्हा चित्रपट सावरतो. ‘आवारापन 2’ शेवटी काय सांगतो? हा सिनेमा काही नवीन करण्याचा दावा करत नाही.
तो प्रयोगशील नाही. तो आश्चर्यचकित करत नाही. तो फार खोलवर जाण्याचा प्रयत्नही करत नाही. पण त्याला आपला प्रेक्षक माहीत आहे. त्याला आपला स्टार माहीत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला ‘आवारापन’ची नॉस्टॅल्जिया किती ताकदवान आहे, हे माहीत आहे. पहिल्या भागात इमरानचा नायक प्रेमासाठी काहीही करण्यास तयार होता. या भागात त्याच प्रेमाला अॅक्शनचा, सूडाचा आणि ‘मास हिरो’चा तडका दिला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे…
‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्याच दिवशी 23.4 कोटींची कमाई
तो इमरानला शोभतो. Awarapan 2’ हा उत्कृष्ट सिक्वेल नाही; पण तो पूर्णपणे निराश करणारा सिनेमाही नाही. हा चित्रपट कथा किंवा पटकथेपेक्षा इमरान हाश्मीच्या स्टारडमवर आणि ‘आवारापन’च्या नॉस्टॅल्जियावर अधिक जगतो.जर तुम्ही Awarapanचे चाहते असाल, इमरानचा तोच जखमी चेहरा, शांत डोळे, अॅक्शन आणि दर्दभरी गाणी पुन्हा अनुभवायची असतील, तर एकदा नक्की पाहा.
⭐⭐⭐3 / 5 ⭐
का पाहावा?
इमरान हाश्मी साठी… नॉस्टॅल्जिक तेरा मेरा रिश्ता आणि जुन्या Awarapanच्या भावविश्वाशी जोडलेल्या ट्रीटमेंटसाठी
का टाळावा?
ओल्ड वाईन इन न्यू बॉटल
व्यक्तिरेखा आणि भावनिक प्रसंग अधिक गहिरे नाहीत म्हणून
थोडक्यात काय?
सिक्वेल नॉस्टॅल्जिक फिलिंग देतो पण मजा नाही… इमरान हाश्मीने तारून नेलेली फिल्म…