Download App

राज्यव्यापी दौरा, 57 गाड्या अन् शेकडो कार्यकर्ते; जरांगेंच्या अवाढव्य दौऱ्याचा अफाट खर्च कोण करतं?

  • Written By: Last Updated:

How Managed Manoj Jarange Patil Mharashtra Tour Konow About Planning :  मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्याआधी जरांगेचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. ठिकठिकाणी जरांगेंच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असताना त्यांच्या या दौऱ्यामागे पाठिंबा देणारे काही गुप्त हात आहेत असा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे नेमकं जरांगे पाटलांच्या दौरा कुणी स्पॉन्सर करतयं का? त्यांच्या डिझेल, जेवणाचा खर्च कोण करतयं? ताफ्यात नेमक्या किती गाड्या या सर्वांवर जरांगेसोबत सावली सारखे वावरणारे संजय कटारे यांनी खुलासा केला आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Maratha Reservation : ‘त्या नोंदीही शिंदे समितीने जाहीर कराव्या; बबनराव तायवाडेंची मागणी काय?

ताफ्यात किती गाड्या?

आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. राज्यातील विविध भागात त्यांच्या सभांचे आयोजन केले जात असून, सभास्थळी पोहण्यासाठी सनरूफ असलेल्या कारसह एकूण 57 गाड्या आहेत. यात गाड्यांना 1 ते 40 नंबरींग केलेले आहे.

डिझेलचा खर्च कोण करतं?

या दौऱ्याचे नियोजन करणारे आणि संपूर्ण दौऱ्यादरम्यान सावली सारखे वावरणारे संजय कटारे म्हणाले की, आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी दौरे झाले त्यासाठी गाड्यांमध्ये लागणारे डिझेल आणि त्याचा खर्च आपापल्या खर्चाने केला जातो. यासाठी एक रुपयादेखील कुणाचा घेण्यात आलेला नाही. ज्यांच्याकडे गाड्या नाही त्यांनी भाड्याने गाड्या घेत य दौऱ्यात सहभाग नोंदवल्याचे कटारे म्हणाले.

Ajit Pawar : अजितदादांची नवी खेळी! काका, बहिण अन् कोल्हेंना वगळलं तर, पवारांच्या जवळील व्यक्ती टार्गेट

जरांगे पाटलांच्या गाडी समोर कोणती गाडी?

सभांच्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्यांना लागणाऱ्या डिझेल आणि खर्चाबाबत कटारे यांनी सांगितले. त्यानंतर जरांगेचा ताफा नेमका कसा असतो याबाबत जरांगे पाटलांच्या गाडीच्या चालकाने सांगितले की, ताफ्यात सर्वात समोर स्कॉटिंगची गाडी असते. त्यापाठीमागे जरांगे पाटलांची गाडी असते. ज्यावेळी एखाद्या ठिकाणच्या सभेसाठी गाड्यांचा ताफा निघतो. त्याआधी सर्वांना सप्ष्ट सूचना दिलेल्या असतात. यात प्रामुख्याने सर्व गाड्या एका लाईनीत शिस्तीत चालवण्यास सांगितले जाते.

याशिवाय ज्या गाड्यांना जसे नंबर दिले आहेत त्याच क्रमाने गाड्या धावतात. गाड्या चालवतांना कोणताही नियम मोडला जाणार नाही किंवा अपघात होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली जाते. त्यामुळे संपूर्ण ताफ्यात सहभागी होणाऱ्या गाड्या अन् व्यक्ती पाटलांच्या आदेशाचे कटेकोरपणे पालन केले जात असल्याचे जरांगे पाटलांच्या गाडी चालकाने सांगितले.

भुजबळांनी डिवचलं तर जरांगेंनीही सुनावलं; ‘म्हातारं’ म्हणत केला एकेरी उल्लेख

जेवणाची व्यवस्था कशी केली जाते?

स्वागत, गाड्यांचा ताफा डिझेच्या खर्चाबाबत माहिती दिल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे जरांगेंसोबत सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या जेवणाचा. याबाबत कसे नियोजन केले जाते त्यावर ज्या ठिकाणी सभा असते. त्या ठिकाणी असलेल्या आयोजकला किती गाड्या आणि त्यात किती माणसं आहेत याची कल्पना दिली जाते. त्यानुसार जेवणासाठी त्यांच्याकडून डब्यांचे आयोजन केले जाते.

सकाळच्या नाष्ट्याचं नियोजन मुक्कामाच्या ठिकाणी असतो तर, दुपारच्या जेवणाचे डब्बे प्रत्येक गाडीत दिलेले असते. हे सर्वजण कुठेही ताफा न थांबवता चालत्या गाड्यांमध्येच जेवण करतात. दुपारचे जेवण साधारण 12 ते 1 च्या दरम्यान तर, रात्रीचे जेवळ मध्यरात्री अडीच ते तीनच्या दरम्यान केले जाते असे कटारे यांनी सांगितले. जरांगे पाटलांसोबत असणाऱ्या व्यक्तींचे गट तयार करण्यात आले आहे. त्या प्रत्येक गटाला कामाचे स्वरूप वाटून देण्यात आले आहे. ज्यात काहीजण जेवणाचे, काही राहण्याचे तर, काहीजण सोशल मीडिया आणि अन्य जबाबदाऱ्या पार पडतात.

Mahrashtra Kesari : नेमकी खरी स्पर्धा कोणती? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi

Tags

follow us