Download App

Monsoon : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंजाबराव डख यांनी पावसाविषयी दिली ‘ही’ माहिती…

Monsoon : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरणीची कामे खोळंबली होती. अखेर ही रखडलेली कामे पूर्ण करण्याचे संकेत हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिले आहे. कारण राज्यातील सर्वच भागांत 1 ऑगस्टपर्यंत पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

डख म्हणाले, आज मध्यरात्रीपासून राज्यभरात मुसळधार पाऊस बरसणार आहे. डख यांच्या अंदाजानूसार 18 जुलैपासूनच राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. 18 जुलैपासून ते 20 जुलैपर्यंत सर्वत्र मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं डख यांनी स्पष्ट केलं आहे.

सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात आता महिला आयोगाची एंट्री, थेट पोलिसांना पत्र

तसेच 23 जुलै ते 25 जुलैपर्यंत पुन्हा जोरदार पाऊस पडणार असून 28 जुलै 1 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कसलीही चिंता न करण्याचं आवाहन डख यांनी केलं आहे. एकूणच 30 जुलैपर्यंत राज्यात एक दिवसाआड पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज डख यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करु नये, जर अचानक वातावरणात बदल झाला तर पुढील अंदाज वर्तवण्यात येणार असल्याचंही पंजाबराव डख यांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे राज्यातील हवामान विभागाकडूनही पुढील तीन दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानूसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Tags

follow us