सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात आता महिला आयोगाची एंट्री, थेट पोलिसांना पत्र

सोमय्यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात आता महिला आयोगाची एंट्री, थेट पोलिसांना पत्र

State Commission for Women on Kirit Somayya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. कायम विरधी पक्षातील नेत्यांवर बेधडकपणे आरोप करणाऱ्या सोमय्यांचा या व्हिडिओ प्रकरणाचा परिणाम विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही दिसून आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) या प्रकरणी सभागृहात आवाज उठवत सोमय्यांवर गंभीर आरोप केले. तर आता राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या संदर्भात आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) मुंबईच्या पोलीस (Mumbai Police) आयुक्तांना पत्र लिहित या घटनेचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (submit a factual report of the incident Womens commission orders police in Kirit Somaiyas offensive video case)

काल सोमय्या यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी जोडो मारत आंदोलन करत तीव्र निषेध केला जात आहे. अशातच आता या प्रकणात राज्य महिला आयोगाने उडी घेतली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना सूचना दिल्या आहेत.चाकणकर यांनी याबबत पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं, सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे. या व्हिडिओबाबत विविध सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची वस्तुस्थितीदर्शक तपासून महिला आयोगाला अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

https://twitter.com/Maha_MahilaAyog/status/1681287519818612738?s=20

राज्य महिला आयोगाचे पत्र-
महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनिय, 1993 अंतर्गत कलम 10(1) (फ)(एक) व (दोन) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आदी त्या बाबींची स्वादिकारे दखल घेणे याकरिता प्राधिकृत कऱण्यात आले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ माध्यमातून प्रसारीत होत आहे. सदर बाबच विविध सामाजिक संस्थाकडून महाराष्ट्र राज्य महिला आयोगास विचारणा होत आहे.

तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करून आपण केलेल्या कार्यवाहिचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, 1993 कलम 12(2) व 12 (3) नुसार तात्काळ सादर करावा.

किरीट सोमय्यांचा खुलासा काय?

किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, मी कोणत्याही महिलेचे शोषण केलेले नाही. माझ्यावर आरोप केले जात आहेत किंवा ज्या व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्याच्या सत्यता पडताळून चौकशी झाली पाहिजे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

 

गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले?
सभागृत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. त्यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, सोमय्यांविषयी जी तक्रार आली आहे, त्याची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. हे प्रकरण दाबले किंवा लपवले जाणार नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube