Download App

मनुकुमार श्रीवास्तव ठरले पहिले मुदतवाढ न मागणारे मुख्य सचिव

राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव हे मुदतवाढ न मागणारे पहिलेच मुख्य सचिव ठरले आहेत. राज्याचे मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती झाल्यानंतर मनूकुमार श्रीवास्तव यांनी राज्याच्या सेवा हमी कायद्याच्या आयुक्तपदी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे श्रीवास्तव यांना मुदतवाढ मिळालेली नाही. 30 एप्रिल रोजी मावळते मुख्य सचिव श्रीवास्तव यांच्याकडून मनोज सौनिक कारभार स्वीकारणार आहेत.

विरोधकांचा धुव्वा उडवत तिवसा बाजार समितीवर पुन्हा Congress चा झेंडा

मनोज सौनिक यांना तीन महिन्याचा कालावधी मिळेल, अशी शक्यता आहे. मनोज सौनिकानंतर या पदावर येण्यासाठी नितीन करीर यांचा क्रमांक लागतो. जर सौनिक यांना मुदतवाढ मिळाली तर करिर यांचा क्रम धोक्यात येण्यार असल्याचे चिन्ह आहेत. मात्र, ही शक्यता खूप कमी आहे.

करीर यांना देखील मुख्य सचिव पदाचा तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. करिर यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनूसार सुजाता सौनिक या मुख्यसचिव पदाच्या मुख्य दावेदार असणार आहेत. सुजाता सौनिक मुख्य सचिव झाल्यानंतर सुजाता सौनिका या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यसचिव बनू शकणार आहेत.

Barsu Refinery Protest : वेळ पडल्यास बारसूमध्ये जाणार, अजित पवार भूमिपुत्रांसाठी सरसावले…

याआधी चंद्रा अय्यंगार आणि सौ गाडगिळ या पदावर दावेदार होत्या. पण त्यांना मुख्य सचिवपद मिळू शकलं नव्हतं. त्यामुळं असाच क्रम राहिला तर सुजाता सौनिक पहिल्या महिला सचिव होऊ शकतील. सचिव पदासाठी अनेक अधिकारी यांच्यात स्पर्धा आहे हे पाहता नजीकच्या काळात मुख्यसचिव यांना मुदतवाढ मिळाल्याने दुरापस्त असण्याची शक्यता आहे.

राज्यात नैसर्गिक आपत्ती, कायदा सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरच मुख्य सचिवांना मुदतवाढ देणं आवश्यक आहे, मात्र, हा नियम अनेकदा डावलला गेल्याचं चित्र आहे. मनुकुमार श्रीवास्तव यांनी मुदतवाढ मागितली नाही. या पूर्वी अनेक मुख्य सचिव यांनी मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

Brijbhushan Singh : नीरज चोप्रा, कपिल देवही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मैदानात; कुस्तीपटूंच्या आंदोलनाला क्रीडाविश्वातून पाठिंबा वाढला

त्यामध्ये अनेकांना तत्कालीन सरकारने मुदतवाढ देखील दिली आहे. यामध्ये जयंत बाठीया, डिके जैन, अजॉय मेहता या मुख्यसचिवांना मुदतवाढ मिळालेली आहे. अजॉय मेहता हे एकमेव मुख्य सचिव आहे की ज्यांना दोन वेळा मुख्य सचिवपदी मुदतवाढ मिळालेली आहे.

कोरोना काळात अजॉय मेहता यांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता मनोज सौनिक यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. त्यांनतर नितीन करीर हे तीन महिन्यांसाठी मुख्यसचिव होऊ शकणार आहेत. तर करीर यांना आधीच्या सचिवांप्रमाणेच मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुजाता सौनिक या राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव होतील का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण यापूर्वी चंद्रा अय्यंगार आणि सौ गाडगीळ यांना संधी असूनही मुख्य सचिव होता आलं नव्हतं.

Tags

follow us