विरोधकांचा धुव्वा उडवत तिवसा बाजार समितीवर पुन्हा Congress चा झेंडा

  • Written By: Published:
WhatsApp Image 2023 04 28 At 9.49.08 PM

Apmc Election Tivsa, Amravati : आज राजभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान पार पडले. अनेक बाजार समित्यांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे तसेच काही बाजार समित्यांचा निकाल आज उशीरा जाहीर झाला यामध्येअमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. तेथे काँग्रेस आघाडीच्या मंडळाने एकहाती सत्ता मिळवली आहे. येथे पुन्हा एकदा माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्वस्व कायम असल्याचे पाहायला मिळाले.

यानिवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या मंडळाने १८ पैकी १८ जागा जिंकून विरोधानकांचा धुव्वा उडवला आहे. या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी प्रथमच ठाकरे गटासोबत निवडणूक लढवली होती. येथे महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळाली होती. काँग्रेस व ठाकरे गट एकत्र लढले तर राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली. हा यशोमती ठाकूर यांचा मोठा विजय मानला जात आहे तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, युवा स्वाभिमान पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.

निकाल स्पष्ट होताच आमदार यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस व ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच ठाकूर यांनी गुलाल उधळत आनंद साजरा केला. विजयी उमेदवारात राजेश वेरुळकर, विवेक देशमुख, विनायक तसरे, गजानन वानखडे, मनोज साबळे, स्वप्निल केने, जयकांत माहुरे, मेघा गोहत्रे, वंदना पारेकर, रवींद्र राऊत, मंगेश राठोड, राजेंद्र मढावे, विशाल सावरकर, अशोक मनोहर, जितेंद्र बायस्कर, कैलासकुमार पनपालिया, तुळशीराम भोयर, मोहन चर्जन यांचा समावेश आहे.

Vikhe-Kardile यांना मोठा धक्का, Prajakt Tanpure यांनी बाजार समिती ठासून आणली !

यावेळी आमदार यशोमती ठाकूर, ठाकरे गटाचे विलास माहुरे, युवती सेनेच्या तेजस्विनी वानखडे, दिलीप काळबांडे, मुकुंद देशमुख काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश पारधी, शहराध्यक्ष शेतू देशमुख, नगराध्यक्ष योगेश वानखडे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने, पंकज देशमुख, मुकुंद पुनसे, हरिदास भगत यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थिती होते.

 

 

 

 

Tags

follow us