Download App

‘धोरण आखले आहे’! दसऱ्याच्या मुहुर्तावर सीमोल्लंघन करत शिंदे सरकार देणार जरांगेंना मोठं गिफ्ट?

  • Written By: Last Updated:

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्यभर फिरणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतेही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, जरांगे पाटलांनी 24 तारखेनंतर आंदोलनाबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर आज (दि. 23) सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या राज्य सरकार बॅकफुटवर आले असल्याचे दिसून येत आहे. आजच्या जाहिरातीत मराठा आरक्षणासाठी धोरण आखले असल्याचे सांगण्यात आले आहे. “धोरण आखले आहे..तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे असा मजकूर देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकार दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करत जरागेंसह मराठा समाजाला मोठं गिफ्ट देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Shinde Government New Advertisement For Maratha Reservation )

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले वाघ बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई कालवश

पहिल्या जाहिरातीवरून जरांगेंनी केली होती टीका

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य सरकारकडून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. या जाहिरातीवरू जरांगे पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आजच्या वर्तमान पत्रांमध्ये विस्तृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातील मजकूरावरून सरकार बॅकफुटवर आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली असून, दसऱ्याच्या मुहुर्तावर सरकार मराठा समाजाला मोठं गिफ्ट देणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे.

तामिळनाडूत BJP ला मोठा धक्का, गंभीर आरोप करत दिग्गज अभिनेत्रीचा रामराम

प्राकशित जाहिरातीत नेमकं काय?

एक दिवसापूर्वी राज्य सरकरकडून इडब्लूएसबद्दल एक भलीमोठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. या जाहिरातीवरून जरांगे पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर आज पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारकडून फुल पेज जाहिरात पहिल्या पानावर प्रकाशित करण्यात आली आहे.

या जाहिरातीमध्ये मराठा आरक्षणासाठी धोरण आखले असल्याचे सांगण्यात आले आहे. “धोरण आखले आहे..तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाचे वचन पूर्ण करण्याचे. पुनःश्च… मराठा समाजाच्या हक्काचे संविधानाच्या चौकटीत व न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यास हे शासन बांधील आहे.” असा मजकूर छापण्या आला आहे.

छापण्यात आलेल्या आजच्या जाहिरातीत वरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. तर खालील बाजूस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो छापण्यात आले असून, आजच्या जाहिरातीतून सरकारकडून मराठा समाजाला आश्वस्त करण्याचा आणि आंदोलन पुन्हा पेटू नये यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच उद्याच्या दसऱ्याच्या मुहुर्तावर राज्य सरकार मराठा समाजासाठी काही मोठी घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us