Maratha reservation : मराठा आरक्षणावरून (Maratha reservation) राज्याच्या कानाकोपऱ्यात वातावरण तापलं आहे. यातही मराठवाड्यात या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडल्या आहेत. यात बीडमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यालय, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे घर आणि गाड्या पेटवून देण्यात आले. याशिवाय आमदार आणि खासदार यांचे राजीनामा सत्र सुरु आहे.
Vikramaditya Motwa: फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेल्या प्रतिसादाबद्दल अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली आज उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत कोणाची फसवणूक होणार नाही, कायद्याच्या कक्षेत आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, मात्र सरकारला थोडा वेळ द्यावा. सरकार हा निर्णय तातडीने घेऊ शकत नाही. कारण आम्हाला वाटते की हे, आरक्षण कायद्याच्या कक्षेत द्यायला हवे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना दाखले देणार आहोत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरागेंनी तब्येतीची काळीज घ्यावी, असं आवाहन केलं.
आम्हाला थोडा वेळ द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण, थोडा वेळ म्हणजे किती वेळ द्यायचा? आम्ही 40 वर्षे वाट पाहिली. त्यामुळे आता मुदतवाढ देण्यास आमचा विरोध. जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, खंबीर राहू, असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. तसेच कुठेही जाळपोळ आणि दगडफेक करु नका, आत्महत्या करु नका, असे आवाहन केले.
अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. अशातच खासदार-आमदाराच्या राजीनाम्याचंही सत्र सुरू झालं आहे. काल नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. तर आज बीडमधील भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला आहे. गोडसे आज आंदोलकांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी गाडसे यांना आंदोलकांनी जाब विचारला आणि समाजाच्या हितासाठी राजीनामा देण्याची मागणी केली.
यवतमाळमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शानस आपल्या दारी दारी कार्यक्रमाचे आयोजन केलेहोते. या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी कार्यक्रमात गोंधळ घातल्यानं पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. बीडमध्ये आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी आणि घर पेटवून दिले. आंदोलकांनी सोळंके यांच्या बंगल्यातील पार्किंगला आग लावल्यानं या आगीत त्यांच्यी गाडीसह बंगलाही जळून खाक झाला. त्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे कार्यालय, माजलगाव नगरपरिषद पेटवून दिली. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्याही कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
बीडमध्ये चिघळलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून बीड, लातूरकडे जाणारी एसटी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. याशिवाय इंटरनेट सेवाही बंद केली आहे. तर महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा खंडीत केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागमीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाना आता उग्ररूप धारण केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून धाराशिव येथील शिंगोली सर्किट हाऊसजवळ सोलापूर-धुळे महामार्गावर मराठा आंदोलकांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून येत्या दोन दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास आणखी तीव्र व हिंसक आंदोलन करण्याचा इशारा समाजातील लोकांनी दिला आहे.