Pankaja Munde : कोणीतरी घोषणा करुन नाहीतर कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावं लागणार असल्याचं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यावर टोलेबाजी केली आहे. शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त पंकजा मुंडे आज सांगलीत दाखल झाल्या. यावेळी पंकजा मुंडे यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं असून त्यांनी सांगलीचे आराध्यदैवत गणपतीचे दर्शनही घेतले.
Maratha Reservation : कुणबी दाखला मिळणार! गठीत केलेल्या समितीची कार्यपद्धती कशी असणार?
पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या, राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन घमासान सुरु आहे, जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणानंतर कोणीतरी घोषणा करुन आरक्षण मिळणार नाहीतर कायदेशीर मार्गानेच आरक्षण द्यावं लागणार असल्याचं मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे, असे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठासह धनगर, लिंगायत, मुस्लिम….; सुप्रिया सुळेंची मागणी
गेल्या दहा दिवसांपासून जालन्यात मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळावेत, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्यभरातून मराठा समाजाकडून त्यांना पाठिंबा देण्यात येत असून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणीने पुन्हा एकदा राज्यात रान पेटवलं आहे. अशातच विरोधकांकडूनही या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे.
BJP : बंगालमध्ये भाजपला धक्का! नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांची पक्षाला सोडचिठ्ठी
अखेर जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्त न्यायधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केली असून ज्यांचे निजामकालीन कुणबी असल्याचे पुरावे असतील अशा मराठवाड्यातील मराठा कुणबी, कुणबी मराठा तरुणांना कुणबीचे दाखले देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेवर बोट ठेवत पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
आमदार रोहित पवारांचीही टीका :
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने महाराष्ट्रात विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा ठराव मंजूर करुन घेत तोच ठराव संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर करुन मंजूर करुन घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. असं केल्यानेच राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असंही ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नये, असंही ते म्हणाले.