Download App

Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यानंतर एकनाथ शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का?

  • Written By: Last Updated:

मुंबई : देशाच्या राजकारणात मराठा नेता म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांची ओळख आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ही ओळख पुसून तर टाकत नाहीत ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मराठा आरक्षणामुळे शिंदे मराठा स्ट्राँगमॅन झालेत का? त्या मागची कारणे नेमकी कोणती हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून घेणार आहोत. ( CM Eknath Shinde Become Maratha Strongmen After Jarange Reservation Protest)

Maratha Reservation: शरद पवार ते एकनाथ शिंदे; 44 वर्षांत मराठा आरक्षणाचे काय झाले ?

शिंदे मराठा स्ट्राँगमॅन होण्यामागची कारणं काय?

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा काही प्रमाणात सोडवण्यात यशस्वी झालेल्या एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण देणारचं असल्याचा शब्द दिला होता आणि तो त्यांनी प्रत्यक्षात उतरवालादेखील. तसे बघितले गेल्यास एकनाथ शिंदेंचा दबदबा हा कल्याण आणि ठाणे या भागातच आतापर्यंत राहिलेला आहे. परंतु, मराठा आरक्षणामुळे शिंदेंची मराठावाड्यात एन्ट्री झाली आणि जी आतापर्यंत कोणत्याही मराठा नेत्याला जमलेली नाही. याचा फायदा त्यांना आगामी काळात नक्की होईल यात काही शंका नाही.

Maratha Reservation: हे फक्त निवडणुकांसाठीचे गाजर.., मराठा आरक्षणावर किरण माने यांची पोस्ट

मराठवाड्याचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास बघता या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा राहिलेला आहे. म्हणजे थोडक्यात मराठावाडा हा ठाकरे गटाचा बालेकिल्लाच होता. मात्र, मराठा आंदोलनात शिंदेंनी स्वतः पुढाकार घेत ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सेफ एन्ट्री केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात शिंदेंनी जातीनं लक्ष घातले होते. एवढेच नव्हे तर, तोडगा काढण्यासाठी ते स्वतः जरांगेंशी थेट संवाद साधल होते. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मध्यंतरी शिंदेंनी मुंबईहून थेट अंतरवली सराटी गाठलं होतं. त्यांच्या या कृतीनं मराठा समाजात त्यांची एक वेगळी छबी निर्माण होण्यास मदत झाली.

अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार, सदावर्ते दंड थोपटत मैदानात; जरांगे अन् शिंदेंना थेट चॅलेंज

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना शिंदेंनी स्वतः एक मराठा लाख मराठा ही घोषणा देत मराठा समाजातील जनतेला बळ देण्याचे काम केले. शिंदेंच्या या घोषणेमुळे केवळ मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील जनतेचा विश्वास संपादित करण्यास शिंदेंना मदत झाली. मध्यंतरी केलेल्या बंडखोरीनंतर शिंदेंवर चहूबाजूंनी मिंधे सरकार म्हणून आरोप केले जात होते. मात्र, या सर्व गोष्टींकडे दूर्लक्ष करत शिंदे केवळ आणि केवळ सर्व समाजातील लोकांसाठी काम करण्यावर आणि विकासाच्या राजकारणावर काम सुरू ठेवले. या त्यांच्या भूमिकेमुळे शिंदेंची संपूर्ण महाराष्ट्रात कामसू मुख्यमंत्री म्हणून समोर येण्यास मदत झाली.

अधिसूचना निघाली, जरांगेंनी गुलालही उधळला… पण सगेसोयरे प्रकरणातील अडचणी काय?

मराठा आरक्षणात शिंदे-फडणवीस सरकारच्या पडद्यामागे अनेक हालचाली घडत होत्या. मात्र, जरांगेंशी किंवा मराठा समाजातील नेत्यांशी चर्चा करताना शिंदे आघाडी घेत होते. कारण जर, फडणवीसांनी हा मुद्दा हातात घेतला असता तर, याला मराठा-ब्राह्मण अशी तार जोडण्यात आली असती आणि या दोन्ही समाजातील वाद वेगळ्या वळणावर गेला असता. त्यामुळे जरी आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस आणि शिंदेंची पडद्यामागे एकत्र चर्चा होत असली तरी, मुख्य भूमिकेत शिंदेंनी आघाडी घेतली हे मात्र नक्की. त्यांची ही आघाडी बघता शिंदे केवळ कल्याण ठाणे भागातील नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी स्ट्राँगमॅन म्हणून समोर येण्यास मदत झाली आहे हे मात्र नक्की.

follow us

वेब स्टोरीज