Maratha Reservaiton : 29 ऑगस्टपासून शेवटचं निर्णायक आंदोलन…मनोज जरांगे यांचा सरकारला अल्टिमेटम!

28 ऑगस्टपर्यंत हैद्राबाद गॅझेटिअरनूसार सर्व प्रमाणपत्र न दिल्यास 29 ऑगस्टपासून शेवटचं निर्णायक आंदोल सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीयं.

Untitle (34)

Untitle (34)

Maratha Reservation : 28 ऑगस्टपर्यंत हैद्राबाद गॅझेटिअरनूसार सर्व प्रमाणपत्र न दिल्यास 29 ऑगस्टपासून शेवटचं निर्णायक आंदोलन (Maratha Reservation) सुरु करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे चांगलेच आक्रमक होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अंतरवली सराटीत त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केलीयं.

NEET फेरपरीक्षेचा पेपरही 3 दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला 28 ऑगस्टपर्यंत प्रमाणपत्र न दिल्यास 29 ऑगस्टपासून शेवटचं निर्णायक आंदोलन सुरु करणार आहे. सातारा संस्थान गॅझेटीअर, कोल्हापूर गॅझेटिअर, पुणे, औंध आणि बॉम्बे सरकारचं हे पाच गॅझेटिअर का देत नाहीत? आम्हाला अद्यापर्यंत गॅझेटिअर दिलेले नाही कारण काय? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प नाहीतर चीनमुळे कोरियाच्या शेअर बाजारात भूकंप ! कोस्पीत तब्बल 11 टक्के घसरण

तसेच ओबीसींना लागू असलेल्या सोयी सुविधा मराठ्यांना मिळत नाहीत. केसेस मागे घेतो असं तीन वर्षांपूर्वीच म्हणाले होते, परंतू अद्याप केसेस मागे घेतलेल्या नाहीत. मराठा समाजाला सरकारचं वेड्यात काढायचं काम करीत आहे. 58 लाख प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मराठा समाज मागे हटणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टार्गेट केलेले आहे. आता मी तरी जाईन नाही तर सरकारी तरी जाईल, या शब्दांत मनोज जरांगे यांनी सरकारवर आगडोंब केलीयं.

मंत्री राधाकृष्ण विखे, प्रसाद लाड यांना अनेकदा सांगितले आहे. माझ्या त्यांच्यावर रोष नाही पण तुम्ही सुधारावा असं सांगतोयं. तुम्हाला वैद्यकीय शिक्षण, ओबीसी मंत्रालयात सांगावं लागेल झिरवळ साहेबांच्या मंत्रालयात सांगावं लागेल . हे लोकं फक्त उपसमितीच्या बैठका घेतात . मला मराठा समाज पाहिजे सरकार नाही
मराठा समाज पाठिशी टिकवायचा असेल तर सगळं द्या. ओबीसीच्या सवलती लागू करायला काय हरकत आहे, त्याचा आदेश काढला का तर नाही, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे परतावे का दिले जात नाही? आमचा संयम तुटेल इतकं वेड्यात काढू नका, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Exit mobile version