मराठवाड्यात मागील तीन महिन्यांत (Farmer) 217 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या महिन्यांत अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेल्या गव्हाचे पीक अवकाळीमुळे भुईसपाट झाले. कर्जबाजारी होऊन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं या अस्मानी संकटामुळे कंबरडं मोडलं. रबी हंगामातील नगदी पीक म्हणून गहू पिकाकडं पाहिलं जातं.
शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावला. परिणामी, हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत विभागात 217 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात मार्च महिन्यात सर्वाधिक 82 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा पुन्हा वेळकाढूपणा ; शेतकरी नेते अजित नवले
जानेवारी महिन्यात 76 तर फेब्रुवारी महिन्यात 59 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. 161 प्रकरणांत चौकशी सुरू आहे, तर 44 प्रकरणात मदतीची रक्कम अदा करण्यात आली आहे. 9 प्रकरणे अपात्र ठरली आहेत. 3 प्रकरणे पात्र ठरली असून, त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांपर्यंत अद्याप मदत पोहोचलेली नाही.
गेल्या वर्षी 1,129 आत्महत्या
गेल्या वर्षी 1,129 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील 796 शेतकरी कुटुंबांना मदत करण्यात आली. 140 प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली. 193 प्रकरणे निर्णयाअभावी प्रलंबित आहेत. 7 कोटी 10 लाखांची मदत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने केल्याचे आयुक्तालयाच्या अहवालात नमूद आहे.
जिल्हा आत्महत्या
