Download App

तलाठी भरती घोटाळ्याप्रकरणी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसह 4 जणांना बेड्या, मोठे मासे गळाला लागणार?

  • Written By: Last Updated:

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत (Talathi recruitment exam) परीक्षा केंद्रावरील कर्मचारीच उमेदवारांना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील आय ऑन डिजिटल परीक्षा केंद्रावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजू भीमराव नागरे (Raju Bhimrao Nagre) याला अटक केल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी याप्रकरणात चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकलठाणा येथील आयकॉन परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थींना उत्तरे पुरवणाऱ्या राजू भीमराव नागरे याला पोलिसांनी अटक केली. या रॅकेटमध्ये एका महिलेसह टीसीएसचे कंत्राटी पर्यवेक्षक म्हणून परीक्षा केंद्रावर काम करणारे दोन कर्मचारी सहभागी असल्याची महत्त्वाची माहिती नागरे यांच्या मोबाईलमधून समोर आली आहे. यामध्ये शाहरुख युनूस शेख (27 वर्षे, वैजापूर), पवन सुरेश शिरसाट (26 वर्षे, रा. सिडको), बाली रमेश हिवराळे (30 वर्षे, ब्रिज वाडी) या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर विकी रोहिदास सोनवणे (३० वर्षे, चौका) याच्या नावावर सीमकार्ड असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या रॅकेटमध्ये सक्रिय असलेली आरोपी महिला बाली हिवराळे ही सेंटरवर सफाई कामगार म्हणून काम करते. तिला पैशाची लालूच देऊन देण्यात आली होती. प्रत्येकाची कसून चौकशी केली जात असताना, ती महिला असल्याने तिची चौकशी केली जात नव्हती. यामुळं बाली हिवराळेही मोबईल सोबत नेत असे. परीक्षा केंद्रावरील दुसऱ्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये जाऊन ती मोबाईलवर आलेली उत्तरे कागदावरू लिहून कॉन्ट्रॅक्ट इन्व्हिजिलेटरकडे नेऊन देत असे. तो इन्व्हिजिलेटर ती चिठ्ठी परीक्षार्थींना देत असे.

दरम्यान, राजू नागरे याच्या ताब्यातून पोलिसांनी एटीएम सदृश यंत्र पोलिसांनी जप्त केले आहे. त्याला मास्टर कार्ड म्हटल्या जातं. या मास्टरकार्डमध्ये सिमकार्ड टाकण्याची सुविधा असून या तिघांकडेही मास्टरकार्ड असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

5 सप्टेंबर रोजी पोलिसांनी राजू नागरे याला परीक्षा केंद्राबाहेरून अटक केली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलिसांना थेट मंत्रालयातून फोनाफोनी सुरू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक बडे मासे असरण्याची शक्यता आहे.

Tags

follow us