कँडल मोर्चा भोवला…खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या नामांतरानंतर छत्रपती संभाजीनगर येथे या नामांतराचा काही समाजाकडून कडाडून विरोध होत आहे. या नामांतराला विरोध करत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल ९ मार्चला शहरात परवानगी न घेता कँडल मोर्चा काढला होता. पोलिसांची परवानगी नसल्यामुळे हा कँडल मोर्चा बेकायदेशीर होता त्यामुळे शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात जलील यांच्या विरोधात गुन्हा […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (80)

Imtiyaz Jaleel

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या नामांतरानंतर छत्रपती संभाजीनगर येथे या नामांतराचा काही समाजाकडून कडाडून विरोध होत आहे. या नामांतराला विरोध करत छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल ९ मार्चला शहरात परवानगी न घेता कँडल मोर्चा काढला होता. पोलिसांची परवानगी नसल्यामुळे हा कँडल मोर्चा बेकायदेशीर होता त्यामुळे शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खासदार इम्तियाज जलील यांच्या अडचणी वाढ झाली आहे.

NAAC : कॉलेज, युनिव्हर्सिटींना गुणवत्ता रँक देणारी नॅक वादात का? 

सध्या खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात नामांतरा विरोधी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण सुरु आहे. याच दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी शहरातील काही भागातून कँडल मोर्चा काढण्यासाठी पोलिसांची परवानगी मागितली होती. परंतु कायदा व सुव्यवस्थेमुळे पोलिसांनी या कँडल मोर्चाला परवानगी नाकारली होती. तरी देखील खासदार इम्तियाज जलील यांनी कँडल मोर्चा काढला होता. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन केले म्हणून रस्तावर उतरलेल्या शेकडो लोकांसह खासदार इम्तियाज जलील यांचावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

NAAC : कॉलेज, युनिव्हर्सिटींना गुणवत्ता रँक देणारी नॅक वादात का?

यामध्ये शारेक नक्षबंदी, कुनाल खरात, प्रांतोष वाघमारे, गंगाधर ढगे, गाजी सादोद्दीन उर्फ पप्पु कलानी, सलीम सहारा, वाजीद जहागीरदार, काकासाहेब काकडे, रफीक चिता, जमीर कादरी, मुंशी पटेल, रफत यारखान, खासदार इम्तीयाज जलील यांच्यासह औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक अय्युब जहागीरदार, महमुझ उर्रहमान फारुकी, अबुल हसन हाशमी, परवेज अहमद, शकुर अहमद, बाबा बिल्डर, मोबीन अहमद, शोएब अहमद, आरेफ हुसैनी, फेरोज खान, नासेर सिद्दीकी, मोहम्मद समीर बिल्डर, शकुर सालार, नुसरत अली खान, हाशम चॉऊस, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

Exit mobile version