मराठवाड्यात एकूण ६६ साखर (Sugar) कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. या कारखान्यांनी १ एप्रिल अखेरपर्यंत सुमारे २ कोटी ९७ लाख ७५ हजार ७२ टन ऊस गाळपातून सुमारे २ कोटी ५९ लाख ३५ हजार ७८२ क्विंटल साखरेचं उत्पादन केलं आहे.
यंदाच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्यातील तब्बल ६६ कारखान्यांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये २९ सहकारी, तर २७ खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अहवालानुसार, एक एप्रिलअखेर यंदाच्या ऊस गाळपात सहभागी कारखान्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जालना व बीडमधील दोन-तीन कारखान्यांचे सुरू असलेले तुरळक गाळप वगळता सर्वच कारखान्यांचे गाळप आटोपले होते.
धक्कादायक! बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, कारण काय?
जिल्हानिहाय ऊस गाळप, साखर उत्पादन, उतारा
धाराशिव
कारखाने १४
ऊस गाळप ६१०६१८७ टन
साखर उत्पादन ४८४२२२० क्विंटल
उतारा ७.९३ टक्के
छत्रपती संभाजीनगर
कारखाने ८
ऊस गाळप ३०१५७५७ टन
साखर उत्पादन ३०१८९५ क्विंटल
उतारा १०.२९ टक्के
जालना
कारखाने ५
ऊस गाळप ३२८५८४६ टन
साखर उत्पादन २५६२९०६ क्विंटल
उतारा ७.८ टक्के
बीड
कारखाने ९
ऊस गाळप ४७६१३७८ टन
साखर उत्पादन ३५२५५८९ क्विंटल
उतारा ७.४ टक्के
परभणी
कारखाने ७
ऊस गाळप ३३०३०१८ टन
साखर उत्पादन ३०३१८५५ क्विंटल
उतारा ९.१८ टक्के
हिंगोली
कारखाने ५
ऊस गाळप १६३६८३७ टन
साखर उत्पादन १५८०१३० क्विंटल
उतारा ९.६५
नांदेड
कारखाने ६
ऊस गाळप २१३४७९९ टन
साखर उत्पादन २०६६२९० क्विंटल
उतारा ९.६८ टक्के
लातूर
कारखाने १२
ऊस गाळप ५५३१२५० टन
साखर उत्पादन ५२२४८९७ क्विंटल
उतारा ९.४५ टक्के.
