धक्कादायक घटना! तरुणीला धमकावत ठेवले संबंध, गर्भ राहिल्यानंतर तरुणीची पोलिसांत धाव

प्रकरण उघड झाल्यानंतर तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.

News Photo   2025 11 18T172554.139

News Photo 2025 11 18T172554.139

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Sambhajinagar) येथे एकास्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर कॅफेमध्ये जबरदस्ती अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर धमकावत जबरदस्ती गर्भपात करवून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी फौजदार भागवत ज्ञानोबा मुलगीर असं आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. हा व्यस्ती सध्या नाशिक अकादमीत पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रशिक्षण घेत आहे.

फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीशी तिचे काही महिन्यांपासून मैत्रीचे संबंध होते. त्या मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने तिला भेटण्याच्या बहाण्याने एका कॅफेत नेलं. कॅफेत कोणी नसेल असा अंदाज घेऊन त्याने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला. या घटनेनंतर तो सतत तिला धमकावत राहिला आणि कोणाला सांगितलं तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दबाव टाकत राहीला.

अत्याचारानंतर काही दिवसांनी तरुणी गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं. हे कळताच आरोपीने तिच्यावर मानसिक दबाव टाकून जबरदस्ती गर्भपात करवून घेतल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. एवढंच नाही, तर हा प्रकार कुणाला सांगू नये म्हणून आरोपीच्या बहिणीने आणि वडिलांनीही पीडितेला धमकावल्याचंही तिने सांगितलं आहे. त्यामुळे गुन्ह्यात या दोघांनाही सहआरोपी करण्यात आलं आहे.

नगर परिषदांच्या निवडणुकांचं वार जोरात; बीडमध्ये पोलिसांनी केल्या तलवारी जप्त

प्रकरण उघड झाल्यानंतर तरुणीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. आरोपीवर बलात्कार, धमकी, जबरदस्ती गर्भपात यांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (ॲट्रॉसिटी) गुन्हे नोंदवले गेले आहेत. या प्रकरणामुळे पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थींच्या वर्तनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

पोलीस दलात दाखल होण्यापूर्वीच गुन्हेगारी प्रवृत्तीचे वर्तन दिसणं चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अतिशय संवेदनशीलता आणि वेगाने केला जात आहे. पीडित तरुणीला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तपास अधिकारी आरोपीच्या कुटुंबीयांनी केलेल्या धमक्यांचाही तपास करत आहेत.
आरोपीला ताब्यात घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, घटनास्थळ आणि संबंधित कॅफे परिसरातील CCTV फुटेजही मागवण्यात आले आहेत. या भीषण प्रकरणामुळे शहरात संतापाची भावना पसरली आहे. एक पोलीस अधिकारी होऊ पाहणाऱ्या व्यक्तीकडून असा घृणास्पद कृत्य अपेक्षित नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version