आपसात झालेल्या वादानंतर एकाच घरातील (Sambhajinagar) चार सदस्यांची निघृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मेलेल्या सदस्यांचे अंग कापून एका सुटकेसमध्ये टाकून, नदीत फेकण्यात आले. ही घटना बिहारमध्ये कैमुर येथील रामगढ पोलीस ठाण्यातंर्गत घडली. निघृण हत्या करणाऱ्या आरोपींपैकी दोन जणांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या मारेकऱ्याचे नाव दिपक देवसिंग राजपूत (वय २७, रा. नाचनवेल, ता. कन्नड ह.मु. जाधववाडी), गौतम उर्फ राहुल करमपाल गुप्ता (वय २२, रा. आत्मज, कर्मपाल गुप्ता, ग्रा. डरहक, पो. रामगढ, जि. कैमुर, रा. बिहार) असे आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैमुर (बिहार ) येथील पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर आणि पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांना पोलीस ठाणे रामगढ येथील खुन प्रकरणातील आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती दिली. ही माहिती फोनद्वारे तसेच ईमेलद्वारे देण्यात आली.
सावधान! मुलगी एकच, लग्न नऊ, बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावणारी टोळी
रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुष्ण मुरारी गुप्ता, त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा खुन करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दिपक राजुपत आणि गौतम करमपाल गुप्ता हे दोघे छत्रपती संभाजीनगरमध्ये लपल्याची माहिती देण्यात आली होती. ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निघृण हत्या प्रकरणातील संशयीत आरोपींचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिपक राजपूत आणि गौतम गुप्ता या दोघांची माहिती काढून शरद टी पॉईंट जाधववाडी येथून दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयात हजर करून ट्रान्झीट रिमांड घेऊन बिहार पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
चौघांचे अठरा तुकडे करून सुटकेसमध्ये टाकून फेकले नदीत बिहार राज्यातील जिल्हा कैमुर येथे १० मे रोजी दुर्गावती नदी एक सुटकेस आढळली. या सुटकेसमध्ये तसेच काही गोण्यांमध्ये चार जणांचा १८ तुकडे आढळले. या प्रकरणात पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेतला असता, कौटुंबीक वादातून मृत कृष्ण मुरारी गुप्ता याने काही दिवसांपूर्वी आई आणि भावाला मारहाण केली.
या घटनेची माहिती मुख्य आरेापी विकास गुप्ता याला सांगितले. विकास गुप्ता हा महाराष्ट्रात काम करीत होता. विकास गुप्ता, विकासचा लहान भाऊ गौतम गुप्ता याच्यासह दिपक राजपुत यांनी अन्य आरोपींसह कृष्ण मुरारी गुप्ता, दुर्गेश कृष्ण मुरारी गुप्ता आणि त्यांचे दोन मुलं या चौघांची निघृण हत्या केली. तसेच मृतांच्या शरिराचे अठरा तुकडे करून दुर्गावती नदी सह परिसरात फेकून दिले. अशा निघृण हत्येच्या आरोपींपैकी दोघांना जाधववाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
