Sambhajinagar Violence : संभाजीनगरात झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू
रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. जमावाने वाहनांची नासधूस केली. या हिंसाचारात एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या 51 वर्षीय व्यक्तीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळालेली नाही. एबीपी माझा वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.
इंदूर मंदिर दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर
छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhaji Nagar Riots) येथील किराडपुरा परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दगडफेक करत दोन गट एकमेकांना भिडले. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगलीदरम्यान जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. तसेच सौम्य लाठीमारही केला. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. हल्लेखोरांनी जवळपास 15 वाहनांचे नुकसान केले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, या दंगलीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोन्ही गटांतील नेते त्वेषाने एकमेकांवर आरोप करत आहेत. खासदार संजय राऊत यांनीही काल सरकारवर कठोर शब्दांत टीका केली होती.
छ. संभाजीनगर दंगलीनंतर फडणवीसांचे खैरे अन् दानवेंकडे बोट, म्हणाले, नेत्यांनी…
राऊत म्हणाले, की राज्यात दंगली घडाव्यात अस्थिरता रहावी असे काम सरकार करत आहे. सरकारचा तोच हेतू आहे. राज्यात असेच वातावरण रहावे अशी सरकारची इच्छा असून त्यासाठी मिंधे गटाच्या टोळ्या काम करत आहेत असा आरोप राऊत यांनी केला होता. राज्यात गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. गृहमंत्री फडणवीस वैफल्यग्रस्त आहेत असेही ते म्हणाले होते.