इंदूर मंदिर दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर

जेव्हा या महिलेला रेस्क्यू टीमने बाहेर काढले तेव्हा तिने सर्वप्रथम हात जोडून लोकांचे आभार मानले.

अपघातात जुळ्या बहिणी जखमी झाल्या. या अपघातात यांच्या आईचा मृत्यू झाला आहे

पाण्यात पडल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले. काहींना श्वास घेण्यास त्रास होत होता.

10 ते 12 जणांना दोरीने बांधून वर ओढण्यात आले.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी सकाळी जखमींची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ते म्हणाले - जखमींवर सरकार उपचार करेल. यानंतर त्यांनी घटनास्थळी भेटही दिली.

बचाव पथकाने दोरी आणि शिडीच्या साहाय्याने एक-एक करून लोकांना बाहेर काढले.

मंदिराच्या विहिरीत पडलेल्या लोकांसाठी शुक्रवारी सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले.
