औरंगाबाद : सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांना आपल्याच एका मित्राच्या 30 वर्षीय पत्नीची छेडछाड केल्याचा आरोपाखाली रविवारी अटक केली होती.
आज पोलिसांनी त्यांना अटक करून, न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आज त्यांना अटक करून, न्यायालयात हजर केले होते.
विशाल ढुमे यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मित्राच्या 30 वर्षीय पत्नीचा ढुमे यांनी छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
तर पीडीत महिलेने पोलिसांत तक्रार दिल्याने सिटी चौक पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली होती. दरम्यान आज सकाळी त्यांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती.
तर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ढुमे यांच्याकडून जामिनीसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लक्ष घालून विशाल ढुमेंविरोधात कारवाईची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची याप्रकरणात रविवारी भेट घेतली होती.