Pankaja Munde : गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर गेलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा सक्रीय होणार आहेत. सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आल्यामुळे त्यांनी दोन महिन्यांसाठी राजकीय ब्रेक घेतला होता. त्यामुळे राजकीय घडामोडीपासून त्या पूर्णपणे दूर गेल्या होत्या. पण आता पुन्हा सक्रिय होणार असून राज्याचा दौरा करणार आहेत.
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली आणि त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चेने उद्विग्न होऊन त्यांनी दोन महिन्यांचा राजकीय ब्रेक घेतला होता.
दरम्यान आता दोन महिन्यांचा राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. पुढील महिन्यात त्या शिवशक्ती यात्रा (ShivShakti Yatra) काढणार आहेत. अकरा दिवसांच्या दौऱ्यात त्या राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील देवदर्शन करणार आहेत.
या दौऱ्यामध्ये पाच हजार किलोमीटरचा प्रवास पंकजा मुंडे करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनापासून होणार आहे. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील देवदर्शनासाठी पंकजा मुंडे दौऱ्यावर जाणार आहेत.
पुण्यातील दोन ‘दादांचा’ वाद शिगेला; नाराजी नाट्यात CM शिंदेंची एन्ट्री
बीडमध्ये धनंजय मुंडेंना बळ
राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे. नुकताच अजित पवार गटाचा बीडमध्ये मेळावा झाला होता. त्यामध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचे भरभरुन कौतुक केले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-अजित पवार गट आणि शिंदे गटाने एकत्रित निवडणूक लढवली तर परळी मतदारसंघावरुन पेच निर्माण होऊ शकतो.
जळगावात राष्ट्रवादीला धक्का! खडसेंची साथ सोडत जुन्या शिलेदारांच्या हाती भाजपाचा झेंडा
कोणाच्या विरोधात भूमिका घेणार?
पंकजा मुंडेंचे आतापर्यंतचे राजकारण राष्ट्रवादीच्या विरोधात झाले आहे. नवीन आघाडीमुळे पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठा पेच असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. तर बीड जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व नावापुरतेच आहे. त्यामुळे आगामी जाहीर सभातून पंकजा मुंडे नेमकं कोणावर टीका करणार? कोणाच्या विरोधात राजकारण करणार? याबद्दल कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता दिसून येते आहे.