Dhananjay Munde Criticized Manoj Jarange : बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेल्याचे म्हटले. पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली. याचा मला अभिमान असल्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
अनेक वेळा संकटाच्या काळात गोपीनाथ मुंडे साहेबांपासून पंकजा मुंडेपर्यंत तुम्ही माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभे राहिलात. अनेक संघर्षात तुम्ही मेळावा केला, सोबत कोण आहे बघितलं नाही. भाऊ आहे की नाही हे पाहिलं नाही. जरी 12 वर्ष आपलं पटलं नाही. तरी मी वेगळा मेळावा करण्याचा विचार मनात आणला नाही. कारण ज्याला जो वारसा दिला आहे, त्यानेच तो चालवावा, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता टीका केली.
Video: मराठा समाज कधीच मस्तीत अन् मग्रुरीत वागत नाही; मनोज जरांगे पाटलांचा नारायण गडावरून हल्लाबोल
विजयादशमीनिमित्त भगवानगडावर आयोजित करण्यात आलेल्या दसऱ्या मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पहिल्याच दसरा मेळाव्यावरून त्यांच्यावर टीका केली. मनोज जरांगे यांनी आज सकाळी नारायण गडावर दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी आचरसंहिता जाहीर झाल्यानंतर निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर धनंजय मुंडे यांनी जरांगेंचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर निशाणा साधला.
मुंडे पुढे म्हणाले, संघर्षाच्या काळात आपण एक राहणं गरजेचं आहे. बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेलो आहे. पंकजा मुंडेंनी खूप संघर्ष केला आहे. या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत.’तुम लाख कोशिश करो हमे हराने की हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे’ असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला.
Video: आचारसंहितेनंतर मुख्य भूमिका जाहीर करणार तेव्हा मी सांगेल ते ऐकायचं; जरांगेंनी शड्डू ठोकला