Download App

पवारांच्या बीडच्या सभेला अजितदादांकडून प्रत्युत्तर, बीडमधूनच करणार ‘महाराष्ट्र परिक्रमा’

Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेतून शरद पवार काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदार संघात जाऊन शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आता अजितदादा गटाचे दुसरे महत्वाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कोंडीत पकडण्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. पण शरद पवार यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी ‘परिक्रमा यात्रा’ (Maharashtra Parikrama) देखील बीडमधून सुरु होणार आहे.

येत्या 27 तारखेपासून बीड मधून अजित पवार गटाच्या महाराष्ट्र परिक्रमा यात्रेला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र परिक्रमा यात्रेसोबत ‘संत आपुले दारी’ यात्रा देखील वारकरी अध्यात्मिक आघाडीच्या वतीने यात्रा काढण्यात येणार आहे. तुकाराम महाराजांचे विचार या यात्रेच्या माध्यमातून गावागावात पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने करण्यात येणार आहे.

‘आमची डिग्री एकच, जेल रिटर्न’; मलिकांच्या भेटीनंतर भुजबळांची मिश्किल टिप्पणी

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अजित पवार यांनी महाराष्ट्रात जातीय सलोखा टिकवण्यासाठी ‘वारी आपल्या दारी’ या उपक्रमाची घोषणा केली होती. आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले होते की आपल्या राज्याला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आपले सहकारी वारी आपल्या दारी उपक्रम राबवत आहे. या उपक्रमात ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन ग्रंथ वितरित करणार आहेत.

सोडून गेलेल्यांचे बीडमध्ये डिपॉझिट जप्त होणार : बड्या नेत्याचा मुंडेंसह बंडखोर आमदारांना इशारा

देशात सध्या धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. संविधानाने सर्वधर्म समभाव स्वीकारला आहे आणि तो वारकरी संप्रदयाचा मुळ गाभा आहे. सर्व वारकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा. त्यामुळे समाजाचं प्रबोधन होईल आणि सामाजिक शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यास मदत होईल, असे त्यावेळी अजित पवार यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.

Tags

follow us