Download App

परळीत पोलीस प्रमुख, तहसीलदार अन् गटविकास अधिकारीही वंजारीच, मुंडेंकडून फक्त वापर…; दमानियांचा आरोप

धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणस परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत. - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया

  • Written By: Last Updated:

Anjali Damania : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर बीडमध्ये राजकीय नेत्यांकडून सत्तेच्या गैरवापर होतोय, असा आरोप विरोधक करत आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) शरण जाण्यापूर्वी विरोधकांनी बीड जिल्ह्यात छोट्या-मोठ्या अधिकाऱ्यांची दहशत आहे, या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट कसे आहेत? असे सवाल केले होते. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी परळीमध्ये विशिष्ट समाजाचे अधिकारीच पदावर का आहेत, असा सवाल उपस्थित केला.

AUS vs IND : कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियामधून बाहेर? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला? 

धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणस परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत. सगळ्या वंजारी समाजातील लोकांनी जाग व्हायला हावं आणि ही माणसे फक्त समाजाचा वापर करत आहेत, असंही दमानिया म्हणाल्या.

अंजली दमानिया यांनी परळीत वंजारी समाजाचे अधिकार आहेत, अस म्हणत त्यांची नावे जाहीर केली. दमानिया यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, वंजारी समाजात भगवान बाबांसारखे विचारवंत होते ज्यांनी ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा समन्वय त्यांनी साधला. त्यांचा नावाचा आणि कर्तुत्वाचा दुरुपयोग करुन काही राजकीय नेते आणि वाल्मिक कराड सारखी माणस, या समजाला बदनाम करत आहेत, अशी टीका दमानिया यांनी केली.

Manu Bhaker : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी; आता सर्वोच्च ‘खेलरत्न’ पुरस्कार जाहीर… 

पुढं त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी आपल्या मर्जीतील याच समाजातील माणस परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत. माझा आक्षेप ह्यावर नक्कीच आहे. सगळ्या वंजारी समाजातील लोकांनी जाग व्हायला हावं आणि ही माणसे फक्त समाजाचा वापर करत आहेत हे समजून घ्यायला हवं. मुद्दा समजावण्यासाठी मी पूर्ण यादी देत आहे.

शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा –
परळी शहर पोलीस स्टेशन प्रमुख – रवी सानप
परळी ग्रामीण पोलीस स्टेशन प्रमुख – सुरेश चाटे
परळी तहसीलदार – श्री. व्यंकटेश मुंडे
परळी गटविकास अधिकारी – विठ्ठल नागरगोजे
परळी सह गटविकास अधिकारी – एस एस मुंडे

हा समाज वाईट आहे असे माझे म्हणणे मुळीच नाही. त्यांचा फक्त वापर होतोय हे ह्यातलं सत्य, असं दमानिया म्हणाल्या.

follow us