Apmc Election Beed : आज राजभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान पार पडले. अनेक बाजार समित्यांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे तसेच काही बाजार समित्यांचा निकाल आज उशीरा जाहीर झाला यामध्ये बीड जिल्ह्यातील वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे.
यानिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास महाआघाडीने १८-०० च्या फरकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ मुंडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडवला आहे. हा निकाल म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंना मोठा झटका मानला जात आहे. पंकजा मुंडे गटाला एक पण जागेवर विजय मिळवता आला नाही. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा पराभव मानला जात आहे.
https://letsupp.com/maharashtra/western-maharashtra/apmc-election-rahuri-prajkata-tanpure-panel-won-40202.html
या निकालावरून हे स्पष्ट होत आहे कि बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांची ताकद वाढत आहे. प्रत्येक निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना वरचढ ठरत आहेत. हि निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीसाठी सोपी मनली जात नव्हती. कारण इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश सोळंकी यांची फार ताकद नव्हती परंतु योग्यवेळेला धनंजय मुंडे यांनी सूत्रे हलवून विजय खेचून आणला आणि विरोधी गटाचा धुव्वा उडवला.