Download App

मुलगा अन् हुंड्यासाठी वाद; जवानाकडून गरोदर पत्नीसह चार वर्षांच्या लेकीची गळा दाबून हत्या

नांदेड : महाराष्ट्रातील नांदेड येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाने त्याची गरोदर पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. यानंतर आरोपी सैनिकाने माळकोली पोलीस ठाणे गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.  भाग्यश्री जायभाये (25) आणि सरस्वती (4) असे मृत आई आणि मुलीचे नाव आहे. तर एकनाथ मारुती जायभाये (32) असे आरोपीचे नाव आहे. (Army jawan kills pregnant wife and four-year-old daughter)

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बोरी (ता. कंधार) गावात राहणारे एकनाथ जायभाये हे राजस्थान येथील बिकानेरमध्ये भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. ते काही दिवसांपूर्वी रजेवर आपल्या गावी आले होते. संपूर्ण कुटुंबासह हसत-खेळत वावरण्याऱ्या जायभाये यांची वर्तणूकही चांगली होती. घरी आल्यानंतर मुलीला खांद्यावर घेऊन फिरायचे, बायकोशीही त्यांची वागणूक चांगली होती.

कर्नाटकमध्ये 195 तालुक्यांत दुष्काळ जाहीर होणार; महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या निर्णायकडे राज्याचे लक्ष

मात्र बुधवारी सकाळी 6 वाजता अचानकच त्याने 8 महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि मुलगीची गळा आवळून हत्या केली. यानंतर स्वत: बायकोच्या बहिणीला फोनवरुन घटनेची माहिती दिली. शिवाय माळकोली पोलीस ठाणे गाठून पत्नी व मुलीच्या हत्या केल्याची कबुली दिली आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून तपास सुरू केला.

सगळ्यांना वेठीस धरणारा जरांगे कोण? दिल्लीकरांना पडलेल्या प्रश्नाचा शिंदेंनी सांगितला किस्सा

मुलगा अन् हुंड्यासाठी तगादा :

पहिली मुलगी झाली, आता दुसरा मुलगाच हवा. त्यासाठी गर्भ तपासणी करुन घे. आई-वडिलांकडून प्लॉटसाठी चार लाख रुपये का आणले नाहीत, असे प्रश्न विचारत आरोपी एकनाथने आपल्या मुलीला वारंवार विचारल्याचा आरोप मृत भाग्यश्री जायभाये यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणात एकनाथ जायभाये, आई अनुसया जायभाये आणि वडील मारुती जायभाये यांना अटक करण्यात आली आहे.

Tags

follow us