Download App

Ashok Chavan: न्यायालयाने नवनीत राणांना दिलेल्या दणक्याचे स्वागत

नांदेड- खासदार नवनीत राणांना (Navneet Rana) आज न्यायालयाने दिलेला दणका स्वागतार्ह आहे. जात पडताळणी हा विषय खूप गंभीर आहे. ज्यांच्याकडे डुप्लीकेट सर्टिफिकेट असतील त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, असे माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले. ते नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

खासदार नवनीत राणा यांना शिवडी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी प्रकरणात नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर (Harbhajan Singh Kaur) यांना फरार घोषित करण्यात आलं आहे.

याशिवाय नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच एक महिन्याच्या आत कोर्टापुढे हजर न राहिल्यास प्रॉपर्टीही जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे.

जात पडताळणी प्रकरणात शिवडी कोर्टानं (Shivadi Court) हे निर्देश दिलेत. या प्रकरणातली पुढची सुनावणी 16 फेब्रुवारीला होणार आहे.

तसेच नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली प्रकरणं दोन्ही वेगवेगळी असल्याचे निरीक्षण शिवडी कोर्टाने यावेळी नोंदवले आहे.

नवनीत राणा अमरावतीतील ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यात तो मतदारसंघ अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव होता.

नवनीत राणा यांनी आपण अनुसूचित जातीत असल्याचा दावा करून ती निवडणूक लढवली. मात्र, त्यांनी दाखल केलेलं अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये (लिव्हींग सर्टिफिकेट) फेरफार करून मिळवल्याचे आढळून आले.

Tags

follow us