Download App

मला ‘ईडी’ची नोटीसच नाही…जिल्हाधिकारी पांडेंचं स्पष्टीकरण

AstikKumar Pandey ED Notice : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील घरकुल घोटाळा चर्चेत आहे. या प्रकरणात ईडीने संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे (AstikKumar Pandey) यांना ईडीकडून नोटीस (ED notice) देण्यात आली असल्याच्या चर्चा होत्या. परंतू, आता मला ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याची माहिती आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेतील 40 हजार घरं बांधण्यासाठी 4 हजार कोटी रुपयांच्या बांधकाम निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, निविदा प्रक्रियेत कंपनीकडून घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तुम्ही आमच्या लोकांची काळजी करू नका; अजित पवारांनी फडणवीसांना झापले

दरम्यान घरकुल गैरव्यवहारप्रकरणी ईडीने यापूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. तसेच आज सोमवारी(दि.८) दुपारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांना देखील ईडीची नोटीस आली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण मला असली कोणतीही नोटीस आली नाही अशी माहिती खुद्द आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey)यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरच्या कलेक्टरांना ‘ईडी’ची नोटीस, चौकशीसाठी बोलावणं

देशात इतर ठिकाणी घरकुलबाबतची कामे वेगाने होत असताना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मात्र याबाबतीत पिछाडीवर पडले आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी माध्यमातून देखील चौकशी करण्यात येत आहे असंही पांडे यावेळी म्हणाले.

Tags

follow us