Download App

परळीत मुंडेंना पर्याय सापडला? 700 गाड्यांसह शक्तिप्रदर्शन करत शिलेदार पवारांच्या गटात

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची बीडमध्ये भव्य जाहीर सभा पार पडली. बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातून अनेक बडे नेते, आजी, माजी आमदार पवारांच्या या सभेसाठी उपस्थित होते. पवारांच्या सभेसाठी बीडसह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागातून अनेकांनी उपस्थिती दर्शविली होती. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत सभा यशस्वी करुन दाखविली. (Baban Gite entered Sharad Pawar’s NCP with a strong show of strength)

मात्र त्याचवेळी या सभेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते बबन गीते यांनी. बबन गिते यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रवेशापूर्वी त्यांनी परळी वैद्यनाथाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर तब्बल 700 गाड्यांच्या ताफ्यासह सभास्थळी रवाना झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या गाड्यांची आणि गिते यांच्या शक्तिप्रदर्शनाची सभास्थळी एकच चर्चा सुरु होती.

कोण आहेत बबन गिते?

बबन गिते हे जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी या परळी पंचायत समितीच्या माजी सभापती होत्या. यापूर्वी त्याही राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. आता आज त्यांचे पती बबन गिते हेही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. त्यांच्यासोबत परळीत हजारो कार्यकर्तेही पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर आता परळीत धनंजय मुंडे यांच्याविरोधात पवारांना पर्याय सापडला आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

Tags

follow us