Babanrao Lonikar : जालना जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेते माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि दुसरे माजी मंत्री(Babanrao Lonikar) यांची एक कथित ऑडिओ क्लिप (Audio clip) व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर हे टोपेंना शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येत आहे. शिवाय धमकीही देत आहे. जालना जिल्हा बँक निवडणुकीवरुन झालेल्या वादातून ही शिवीगाळ झाल्याची माहिती मिळत आहे. या क्लीपची लेट्सअप मराठी पुष्टी करत नाही. दरम्यान, यावर आता लोणीकरांना भाष्य करत ती क्लिप खरी नसल्याचं सांगिलतं.
आमदार राजळेंच्या सांगण्यावरून मला मारहाण; मढी देवस्थान अध्यक्षांचा गंभीर आरोप
काही दिवसांपूर्वी जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांच्यात वाद झाला होता. यातूनच टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. सोबतच बबनराव लोणीकर यांच्या घरावर दगडफेक झाल्याची घटनाही समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. दरम्यान, आता या दोन आमदारांची एक तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि शरद पवार गटाचे आमदार आमदार राजेश टोपे यांच्यातील संभाषण दिसून येतं. यात लोणीकर टोपेंना शिवीगाळ करत असल्याचं समजंतय़ दरम्यान, यावर बबनराव लोणीकर यांनी यावर भाष्य केललं. ही ऑडिओ क्लीप खोटी असल्यांचं ते म्हणाले.
‘पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री म्हणूनच..,’; फोटोसेशनवरुन आदित्य ठाकरेंची जहरी टीका
बबनराव लोणीकर यांना क्लिपविषयी विचारले असता ते म्हणाले की, जालना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक होती. माझ्या बंगल्यावर सहा तास मिटींग झाली. आम्ही बिनविरोध निवडणूक केली. निवडणूक होऊन पंधरा दिवस झाले. ही ऑडिओ क्पिल माझी नाही. ही क्लिप खरी नाही. माझं आणि टोपेंचं काहीही बोलणं झालं नाही. ही ऑडिओ क्लिप खोटी आहे. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करू. मी फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी करणार आहे, असं लोणीकर म्हणाले.
राजेश टोपेंच ट्वीट काय?
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत राजेश टोपे यांनी ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, महाराष्ट्राची परंपरा ही सुसंस्कृत राजकारणाची आहे. आम्ही ही परंपरा निष्ठेने जपत आलो आहोत. राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे, शिव्यांची नाही. खालच्या पातळीवरचे राजकारण हा आमचा विषय नाही आणि कधीच नव्हता. राजकीय जीवनातील संस्कृती, मर्यादा आणि सभ्यता याचाच आम्ही पुरस्कार करत आलो आहोत, असं टोपे म्हणाले.