माजी मंत्री राजेश टोपेंच्या गाडीवर अज्ञांताकडून दगडफेक, पोलिसांकडून तपास सुरू

  • Written By: Published:
माजी मंत्री राजेश टोपेंच्या गाडीवर अज्ञांताकडून दगडफेक, पोलिसांकडून तपास सुरू

Rajesh Tope : राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. काही वेळापूर्वी अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक केली. तरुणांनी दगडफेक करून घोषणाबाजीही केली. जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (District Central Bank Jalana) निवडणूकीतून ही दगडफकेक झाल्याची माहिती आहे.

Amol Kolhe : वसुलीशिवाय जागा सोडायची नाही; मुंबई वाहतूक पोलिसांच्या अनुभवानंतर कोल्हेंचा सरकारवर निशाणा 

गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. जालन्यात जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यावेळी राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. टोपे यांची गाडी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्य आवारात उभी होती. तेव्हा या गाडीवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑईलची बाटलीही सापडली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. याची माहिती मिळताच टोपे समर्थकही घटनास्थळी गोळा झाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सुरू असल्याने टोपे बँकेत आले होते. दरम्यान, बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. आता पोलीस सीसीटीव्हीची तपासणी करून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्याची शक्यता आहे.

CRPF मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 75 हजार रुपये पगार 

टोपे हे सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आहेत. त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्हा बँकेची निवडणुक, आरक्षण आंदोलनामुळे जालन्यातील वातावरण संवेदनशील बनले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या गाडीची तोडफोड कोणी केली आणि का केली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतूनही दगडफेक झाल्याचे स्पष्टीकरण टोपे यांनी दिले आहे.

याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होती. निवडणूक बिनविरोध होण्याची प्रक्रिया पार पडत होती. यासाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष देखील हजर होते. परंत, काही असंतोषी लोकांनी जाणूनबुजून गाडीवर दगडफेक केली. ज्यामध्ये कारच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी याबाबत कारवाई करावी. ज्यांना कायदा हातात घेतला त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई व्हावी, असं टोपे म्हणाले.

कार चालक आत असताना दगडफेक
दगडफेकीची घटना घडली तेव्हा कारचा चालक आत होता. त्याचा जीव धोक्यात होता. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही वरच्या मजल्यावर होतो, तेव्हा ड्रायव्हर गाडीत होता, असं राजेश टोपे म्हणाले. यावेळी टोपे यांना मराठा आंदोलकांनी दगडफेक केली का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. मराठा आंदोलकांनी दगडफेक केल्याचा काहीच विषय नाही. त्यांचा अजिबात संबंधच नाही. हा निवडणुकीचा विषय आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube