CRPF मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती सुरू, महिन्याला 75 हजार रुपये पगार
CRPF Bharti 2023: केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) हे आपल्या देशाचे राखीव सशस्त्र पोलीस दल आणि इंटर्नल कॉम्बेट फोर्स आहे. हे दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अतिरेकी रोखण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पोलिसांच्या कामात मदत करणे हे या दलाचे प्राथमिक कार्य आहे. सीआरपीएफमध्ये नोकरी मिळणं ही खूपच अभिमानाची गोष्ट समजजी जाते. देशातील बहुतांश तरुणांना सीआरपीएफमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. दरम्यान, आता केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी’ (Medical Officer) पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
Gold Rate Hike : आठवडा भरात सोन्याच्या दरात दोन हजार रुपायांची वाढ; पाहा आजचा भाव काय?
ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे पार पाडली जाणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या जातात. मुलाखतीची तारीख 4 डिसेंबर 2023 आहे आणि सर्व उमेदवारांनी त्यासाठी हजर राहणे आवश्यक आहे. भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबद्दल तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये दिली आहे.
एकूण पदांची संख्या – १२
शैक्षणिक पात्रता – एमबीबीएस, इंटर्नशिप शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तपशीलवार माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण – जगदलपूर, गुवाहाटी, श्रीनगर, नागपूर, भुवनेश्वर
वयोमर्यादा – 70 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख- 4 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाइट – https://crpf.gov.in/
पगार –
वैद्यकीय अधिकारी- पदानुसार मासिक वेतन ७५ हजार रुपये असेल.
सुचना
सदरील निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल.
उमेदवाराने संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला हजर राहावे.
मुलाखतीची तारीख 4 डिसेंबर 2023 आहे.
महत्वाचं म्हणजे, उममेदवारांनी मुलाखतीला उपस्थित राहतांना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणं आवश्यक आहे.
जाहिरात
https://drive.google.com/file/d/18yOIRhpylldb-wfk5jdzSO2plpzO-ohU/view?pli=1