Gold Rate Hike : आठवडा भरात सोन्याच्या दरात दोन हजार रुपायांची वाढ; पाहा आजचा भाव काय?

Gold Rate Hike : आठवडा भरात सोन्याच्या दरात दोन हजार रुपायांची वाढ; पाहा आजचा भाव काय?

Gold Rate Hike : दिवाळीचा वर्षातील मोठा सण झाल्यानंतर आता लग्नसराईचा (Gold Rate Hike) हंगाम सुरू झाला आहे. विवाहसोहळा म्हटल्यानंतर सोन्याची खरेदी होतेच. परंतु, यंदा मात्र दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. गेल्या काही दिवसांत दररोज म्हटलं तरी सोन्याचे भाव वाढत आहेत. त्यामध्ये आठवडा भरात सोन्याच्या दरात तब्बल दोन हजार रूपायांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह तब्बल 65400 रूपयांवर गेले आहे. ही वाढ विक्रमी ठरली आहे.

‘नाम्या एका श्रीमंत मुलीशी लग्नाचा करार करणार’; मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ ट्रेलरला तुफान प्रतिसाद

दरम्यान सध्या देशात लग्नसराईमुळे सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. दरम्यान काही सोने व्यावसायिकांच्या मते अमेरिकन बॅंकांनी व्याज दर वाढवल्याने सोन्याच्या दरात वाढ होणार असल्यचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र ही व्याजदर वाढ झाली नाही. त्यामुळे सोन्यामध्ये लोकांनी गुंतवणुक करायला प्राधान्य दिलं जात आहे.

Rajasthan Elections : वसुंधरा राजेंचा अपक्षाला फोन, काँग्रेसही अलर्ट; राजस्थानात काय शिजतंय ?

त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आणि सोन्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 63500 तर जीएसटीसह तब्बल 65400 रूपयांवर गेले आहेत. सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू असून या काळात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत लग्नसमारंभात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना जादा किंमत द्यावी लागेल. जागतिक बाजारपेठेतील चढ उतार, 2024 मध्ये जागतिक मंदी येण्याची भीती, डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी, जगभरातील बँकांकडून सोन्याची खरेदी तसेच वाढती महागाई या काही कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मे महिन्यानंतर पहिल्यांदाच सोन्याचे दर इतके जास्त वाढले आहेत. अमेरिकी फेडरल रिजर्व बँक पुढील वर्षात व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दराचा हा उच्चांकच आहे. ऐन लग्नसराईत भाववाढ झाल्याने सोने खरेदीसाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळात विवाह मुहूर्त आहेत. मात्र त्याआधीच सोन्या चांदीच्या भावात वाढ होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube